डिंकलाडू | आगळं! वेगळं !!!

डिंकलाडू

"अहो मालक, कसला हा तुमचा डिंकलाडू? तो फुटला तर नाहीच पण माझा एक दात मात्र पडला, त्याचे काय? संतप्त रामभाऊ तावातावाने काऊंटर जवळ जाऊन हॉटेल मालकाला बोलत होते.
"त्याचे काही नाही, फक्त आमच्या लाडूचेच..."

"अहो लाज नाही वाटत तुम्हाला? इथे माझा दात पडलायं, अन् तुम्ही खुशाल म्हणताय की फक्त आमच्या लाडूचेच म्हणून?" हॉटेल मालकांचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच रामभाऊ उचकले.
"हे बघा रामभाऊ, दात पडण्याचे चार्जेस घेण्याची आमची पद्धत नाही." हॉटेल मालक उत्तरले.

0 Comments:

Post a Comment