2018 | आगळं! वेगळं !!!

shree jyotiba aarati | श्री ज्योतिबा आरती

https://youtu.be/7z_g0ctmhp0

।। श्री ज्योतिबा आरती ।।


आज गुरुवार दि. 13 सप्टेंबर 2018 भाद्रपद शु्ध्द 4 म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या सुमुहुर्तावर ...

वै. प्रल्हाद विष्णू कारंजकर, यांनी रचलेली "श्री ज्योतिबा आरती" ही ध्वनिमुद्रित भक्तिरचना व्हिडिओ स्वरुपात प्रकाशित करताना अतिशय आनंद होत आहे. या लिंकवर क्लिक करुन आपण युट्युबवर हा व्हिडिओ पाहू शकता. तसेच याची व्हिडिओ व ऑडिओ डाऊनलोड लिंक युट्युबवरील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावरुन आपण ही आरती डाऊनलोड करुन घेऊ शकता.

।। श्री ज्योतिबा आरती ।।

जयदेव जयदेव जय ज्योतिर्लिंगा।
आरती ओवाळू भावार्ती ओवाळू तुज अश्वस्वारा ।।ध्रु।।

चैत्र शुद्ध पौर्णिमेसी यात्रा हो भरती।
तव भक्त तुमचे चरणांसी येती।
चांगभले चांगभलेचा जयघोष करिती।
त्यांची सर्व चिंता तुची हरिसी।।१।। जय ।। 

अश्वाचे वाहन तुम्हां शोभते छान। 
जन्मोजन्मी लाभो तुमचे हो ध्यान। 
गुलाल खोबरे उधळुनी भक्त। 
दर्शन घेती तुमचे भान हरपुनी मुक्त।।२।। जय।। 

भक्तजन मेळा हो पालखीस हजर। 
सर्व मुखी होय तुमचा गजर। 
कंठी शोभे तुमचे नवरत्न हार। 
हाती तुमचे त्रिशूळ डमरु तलवार।।३।। जय।।

रचना : वै. प्रल्हाद विष्णू कारंजकर, बार्शी (जि. सोलापूर)
स्वर व संगीत : श्री विनोदजी शेंडगे
ध्वनिमुद्रण : अनाहत स्टुडिओ, पंढरपूर