तुमच्या नावाची रिंगटोन डाऊनलोड करा | आगळं! वेगळं !!!

तुमच्या नावाची रिंगटोन डाऊनलोड करातोच तो पणाचा कंटाळा येत असलेल्या व्यक्तींना नेहमीच बदल हवा असतो, असाच काहीतरी बदल म्हणून आपल्या नावाची रिंगटोन मोबाईलमध्ये वापरण्याकडे सध्या मोबाईलधारकांचा कल दिसून येत आहे. स्वतःच्या नावाची रिंगटोन विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर वापरुन व थोडीशी मेहनत घेऊन बनविता येणे शक्य आहे. पण सध्याच्या धावपळीच्या युगात सगळ्याच गोष्टी झटपट आणि तयार कशा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष असते.

त्यामुळे तुम्हालाही तुमच्या नावाची आयतीच तयार असलेली रिंगटोन डाऊनलोड करुन घ्यायची असेल तर, मी तुम्हाला एक वेबसाईट सुचवितो. या वेबसाईटला भेट द्या. तेथील सर्च रिंगटोन्स या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या नावाची रिंगटोन उपलब्ध आहे का ते शोधू शकता. जर तेथे तुम्हाला हव्या असलेल्या नावांची रिंगटोन तयार मिळाली तर ती तुम्ही लगेचच डाऊनलोड करुन घेऊ शकता.

त्याशिवाय तुमच्या नावांची रिंगटोन तेथे तयार नसेल, किंवा तयार आहे पण त्यामध्ये तुम्हाला काही बदल हवा असेल, तर तुम्ही रिक्वेस्ट रिंगटोन या पर्यायावर क्लिक करुन तुमच्या नावाची तुम्हाला पाहिजे त्या शब्दरचनेची रिंगटोन तयार करुन घेण्यासाठी, दिलेल्या सूचनेनुसार तेथे दिलेला फॉर्म भरुन पाठवावा लागेल. 

याचसोबत या वेबसाईटवर लेटेस्ट, डेव्होशनल, फनी, मराठी, हिंदी, इन्स्ट्रूमेंटल इत्यादी इत्यादी अशा विविध प्रकारात उपलब्ध असलेल्या रिंगटोन्स सुध्दा पहावयास मिळतील.  

7 Comments: