January 2012 | आगळं! वेगळं !!!

एक घाव बारा मती

=> क्रेडिट कार्ड संस्कृती भारतात रुजतेय; दिवाळीच्या एका महिन्यात 26 हजार कोटींची विक्रमी खरेदी
  • नाहीतरी ऋण काढून सण साजरा करण्याची आपली परंपराच आहे

टीव्ही पहा टीशर्टवर!

होय! आता तुम्ही टीशर्टवर टीव्ही पाहू शकाल. विश्वास नाही ना बसत? पण हे शक्य केले आहे Arizona येथील David Forbes या इंजिनिअरने.
 
त्याने बनविला आहे, टीशर्टच्या स्वरुपातील वापरता येईल असा एक एलईडी टीव्ही. नेहमीच काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची जिद्द असणाऱ्या डेव्हिडने एलईडी आच्छादित लवचिक स्वरुपातील सर्किट बोर्ड बनविला आहे. त्यामुळे आता टीशर्टवर टीव्ही पहाता येणे शक्य झाले आहे.

राहुल गांधींची स्टंटबाजी

राहुल गांधींना उत्तर प्रदेशात अटक म्हणजे, राजकुमार आता प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कशी करायची याचे प्रॅक्टीकली धडे गिरवीत आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहायला गेले तर राजकुमारांना आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे राजकीय गुरु दिग्विजयसिंह आणि रीटा बहुगुणा, राजबब्बर या हाय प्रोफाइल राजकीय नेते मंडळीना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्येबाबत किती कळवळा आहे? मनापासून किती आस्था आहे? हा संशोधनाचा विषय ठरेल. केवळ आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून केलेला हा स्टंट आहे हे स्पष्ट आहे.

आता मोबाईल रिचार्ज करा पाण्यावर!


आपल्या जीवनात पुष्कळश्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, कॅमेरा यासारखी उपकरणे आपण वापरतो की जे बॅटरीवर चालतात. आणि त्याची बॅटरी डाऊन होण्याचे प्रसंगही नेहमीच येतात. या बॅटऱ्या रिचार्ज करण्यासाठी इलेक्ट्रीक, सोलर असे विविध प्रकारचे चार्जर्स उपलब्ध आहेत. पण वीज नाही अन् सूर्यप्रकाशही नाही मग चार्जिंग कसे होणार? याची आता चिंता करण्याचे कारण नाही. पाणी तरी आहे ना?