मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी
सध्या मराठी ब्लॉग्जची नोंदणी करणारी मराठी ब्लॉग विश्व, मराठीसूची, मराठी मंडळी, मराठी ब्लॉग जगत, ब्लॉगकट्टा नेटभेट ही संकेतस्थळे तर सर्वपरिचित आहेतच, पण आणखीन एक 'मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी' या नावाचे बऱ्याच लोकांना फारसे माहित नसलेले एक मराठी ब्लॉगची नोंदणी करणारे संकेतस्थळ सुरु झालेले माझ्या पाहण्यात आले आहे.
त्यावर सध्यातरी माझा "आगळं! वेगळं!!!" हा एक ब्लॉग व "मी एक हौशी लेखक" हा दुसरा ब्लॉग असे दोनच ब्लॉग दिसत आहेत. आणि त्यावर हे संकेतस्थळ कुणी सुरु केले आहे किंवा संपर्क इत्यादी काहीही माहिती दिसून येत नाही.
आपला ब्लॉग जितक्या अधिक ठिकाणी नोंदणी केला असेल, तितके ते ब्लॉगच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. आणि अशा सर्व मराठी ब्लॉग्जची शृंखला असणाऱ्या विविध संकेतस्थळावर भेट देणाऱ्या वाचकांना आपल्या ब्लॉगची माहिती मिळते आणि अर्थातच आपल्या ब्लॉगला भेटी देणाऱ्या वाचकांची व पहिल्या जाणाऱ्या पानांची संख्या वाढते.
तरी इच्छुकांनी या नवीन 'मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी' या संकेतस्थळावर आपल्या मराठी ब्लॉगची नोंदणी करण्यास काहीच हरकत नाही, व ती करावी असे माझे वैयक्तिक मत व आवाहन आहे, जेणेकरून आपल्या ब्लॉगच्या ट्रॅफिकमध्ये वाढ होण्यास मदतच होईल.
धन्यवाद,
ReplyDeleteहे मला ही माहिती नव्हते की माझ्या ब्लॉग ची लिंक मराठी ब्लॉग डिरेक्टरी वर उपलब्ध आहे.
नागेशजी, या निमित्ताने आपण ब्लोगला भेट दिलीत. आपले आभार!
ReplyDeleteThanks! Tuamchya likhanala Shubheccha
ReplyDeleteधन्यवाद! आशिषजी.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteहा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे
ReplyDeleteमराठी ब्लॉगधारकांना व वाचकांना एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले आहे.
मी माझ्या मराठी ब्लॉग वर नियमित लिखाण करतो व इतर ब्लॉग नियमित वाचतो व त्यावर प्रतिसाद देतो.
मराठी लिहा ,वाचा ,मराठी जगवा
मराठीतून अभिव्यक्त व्हा
माझा ब्लॉग डिरेक्टरीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रकिया मी पूर्ण केली आहे.
ReplyDeleteपण तो समाविष्ट झाला आहे हे मला कसे कळू शकेन ह्या विषयी मार्गदर्शन हवे होते.