इंग्लिश शिकण्यासाठी एक मस्त अॅप | आगळं! वेगळं !!!

इंग्लिश शिकण्यासाठी एक मस्त अॅप


अँड्रॉईड फोनचा उपयोग प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार करत असतो. कुणाला गेम खेळण्यात मजा वाटते, तर कुणी संगीत ऐकण्याचा आनंद घेतात, तर काही जण सतत इंटरनेटशी कनेक्ट रहाणे पसंत करतात. पण मनोरंजनासोबतच या फोनचा उपयोग शिक्षणासाठी कसा करुन घेता येईल? असा विचार किती लोकांच्या मनात येत असेल?
शिक्षणाचे नांव ऐकताच पडल्या ना तुमच्या कपाळावर आठ्या? नक्कीच पडल्या असणार. आणि ते ही साहजिकच आहे म्हणा. कारण अभ्यासापासून सुटका पाहिजे म्हणून तर फोन हातात घेतलाय, आणि आता पुन्हा इथेही शिक्षणच? काय कटकट आहे, असाच काहीसा विचार तुमच्या मनात आला असणार. पण मी सांगतो ते इंग्रजी शिकण्यासाठी असलेले एक भन्नाट अॅप तुम्ही तुमच्या फोनवर डाऊनलोड करुन घ्या. आणि बघा मग शिक्षणासोबतच मनोरंजनाचा ही अनुभव तुम्हाला आल्याशिवाय रहाणार नाही.
सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेली एखादे पुस्तक वाचत असल्याप्रमाणे इंग्रजी शिक्षणाचा कोर्स डिझाईन केलेली, बरीच रटाळ आणि कंटाळवाणी अॅप्स तुम्ही पाहिली असतील. आणि त्यामुळेच नको ते इंग्रजी शिक्षण अशी तुमची मानसिकता झाली असेल.
पण मी येथे तुम्हाला जे अॅप सांगणार आहे, ते तुम्ही पाहिलेल्या सर्व अॅप्सपेक्षा वेगळं आहे. याचा इंटरफेस अतिशय वेगळा आहे. इंग्रजी ऐकणे, बोलणे, लिहणे आणि वाचणे अशा चारही पध्दतीने हिंदी भाषेतून इंग्रजी शिकण्याचा हा एक विनामूल्य कोर्स आहे. आणि या कोर्सची भाषा हिंदी असल्यामुळे मराठी भाषिकांना हा इंग्रजी शिकण्याचा कोर्स आपल्या मातृभाषेतून शिकण्याइतकाच सोपा आणि जवळचा वाटेल.
हा कोर्स इंटरॅक्टीव्ह पध्दतीने डिझाईन केलेला आहे. शिकणाऱ्याला यात प्रत्यक्ष सहभागी करुन घेत, गंमतीदारपणे, खेळकर पध्दतीने यातील लेसन्स असे पुढे जात रहातात की, शिकणारांना मजा तर येतेच शिवाय ज्ञानही मिळत जाते. शिवाय तुम्ही दिलेल्या उत्तरांचे रिझल्टही येथे ताबडतोब मिळत जातात. आणि अचूक उत्तरांना गुणांऐवजी कॉईन्स दिले जातात. या कॉईन्सचा उपयोग या कोर्समध्ये पुढे काही लेसन्स लॉक्ड आहेत, ते अनलॉक करण्यासाठी करता येतो. आणि आवश्यकतेनुसार कमी असणारी कॉईन्स तुम्हाला मित्रांकडून घेता येतात किंवा त्यांना देता ही येतात.
या कोर्समध्ये सुमारे शंभराहून अधिक लेसन्स आहेत. हा सगळा कोर्स मनोरंजक पध्दतीने शिकत असताना, आवश्यक त्या ठिकाणी उपयुक्त अशा व्याकरणाबाबतच्या टिप्सही प्रदर्शित होत रहातात. या कोर्स मध्ये शब्दसंग्रह देखील आहे. तसेच या कोर्समध्ये मनोरंजनात्मक आणि ज्ञानवर्धक गेम्ससुध्दा समाविष्ट केलेल्या आहेत.
या अॅपचे आणखी वेगळं वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेली हेल्पलाईन. ही एक व्हॉटसअप प्रमाणे चॅटींगची सुविधा असलेली हेल्पलाईन आहे. इंग्लिश शिकत असताना तुम्हाला येणाऱ्या काही शंका, अडचणीबाबत तज्ञांसोबत या हेल्पलाईनद्वारे ऑनलाईन संवाद साधून शंका समाधान करून घेता येण्याची सोय आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कोर्स ऑफलाईन आहे. फक्त हेल्पलाईनचा उपयोग करण्याव्यतिरीक्त इंटरनेट सुरु असण्याची आवश्यकता नाही.
हे अॅप परिवारातील लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांना, तसेच इंग्रजी शिकण्याची नव्याने सुरुवात करणाऱ्यांपासून ते इंग्रजी येत असणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
तुम्हालासुध्दा हे अॅप नक्कीच आवडेल, आणि याचा वापर केल्यानंतर तुम्ही इतरांना सुध्दा याची शिफारस कराल अशी खात्री वाटते. आणि तुम्ही जर तुमच्या परिचितांना व्हॉटसअप अथवा ईमेलने याची शिफारस केली, आणि तुम्ही पाठविलेल्या लिंकवरुन जर कुणी हे अॅप डाऊनलोड करुन, त्याचा वापर सुरू केला तर त्या जॉईनींगचे आणखी चारशे कॉईन्स तुमच्या खात्यावर जमा होतील. आहे की नाही, आम के आम, और गुठली के दाम.
अॅप डाऊनलोड करुन घेण्यासाठी खाली दिलेला QR Code  तुमच्या अँड्रॉईड फोनवर स्कॅन करा, आणि डाऊनलोड करुन घ्या.








किंवा खालील लिंक वेब ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये टाईप करा.
http://goo.gl/sjvUt0

अपडेट : या अॅपच्या निर्मात्यांनी, या अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये हिंदी भाषेसोबत मराठी भाषेचा पर्यायही माध्यम म्हणून उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मराठी भाषाप्रेमी लोकांना इंग्रजी आपल्या मातृभाषेतून शिकणे आता सहज शक्य झाले आहे.

ज्यांनी हे अॅप यापूर्वीच डाऊनलोड केलेले आहे, त्यांनी ते अपडेट करुन घ्यावे म्हणजे त्यांना मराठी भाषेचा पर्याय निवडीसाठी उपलब्ध होईल.
§ § §

0 Comments:

Post a Comment