आगळं! वेगळं !!!

Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवर कलाकाराची फसवणूक

कलाकारांना कसे फसवले जाते?

Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवरील अनुभव


कलाकारांना कसे फसवले जाते? याचे एक उदारहण म्हणून Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवर रांगोळी कलाकार प्रसाद मुंढे यांना आलेला अनुभव वाचा त्यांच्याच शब्दात.


सोनी चॅनल ची मालिका बडे अच्छे लगते है च्या सेटवर ५ तास वाट बघितल्यावर मला सेटवर ही रांगोळी काढायला सांगितली. मी या एका रांगोळीसाठी तीन हजार चार्जेस सांगितले होते.


https://www.aagalavegala.in/
cheating artist on the set of sonyliv's series bade achhe lagte hain


शॉटसाठी लागणारी रांगोळी काढून झाल्यानंतर खलनायकाने शॉट ओके होण्यासाठी रांगोळी वर उभे राहून केलेली डायलॉग बाजी झाल्यावर पूर्ण रांगोळी डिस्टर्ब झाली. 


नंतर स्वतःला आर्ट डायरेक्टर म्हणवणाऱ्या मुलीने मला पुन्हा तशीच रांगोळी काढायला सांगितली. ज्याची आधी मला कुठलीही पूर्व कल्पना दिली नव्हती. मला फक्त एवढेच सांगितले होते, 'आप एक रंगोली करके निकल जाओ, आपको तुरंत पेमेंट मिलेगा।' 

https://www.aagalavegala.in/
cheating artist on the set of sonyliv's series bade achhe lagte hain

नंतर ती रांगोळी पूर्ववत करणे शक्य नसल्याने त्यांना मी सांगितले पूर्ण रांगोळी नविन करावी लागेल व त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस होतील. त्याला त्या आर्ट डायरेक्टरने विरोध दर्शविला व सांगितले, 'जो किया है उसका भी पेमेंट नहीं मिलेगा।'


त्यांनंतर मला प्रोडक्शन हाऊसकडे नेले. त्यांना सर्व वृत्तान्त सांगितल्यावर त्या मॅनेजरने मला सांगितले 'तेरे को करने का है तो कर नहीं तो निकल, पैसा नहीं मिलेगा।'


असं बोलल्यावर मी बॅग घेऊन सेटवरुन निघालो. त्यांचा शॉट अडकल्यामुळे तेथील १५-२० आर्ट डिपार्टमेंटचे लोक माझ्या मागे येऊन समजाऊ लागले की, 'सर करो आप हम पेमेंट देते है आपको।'


दुपारी १२ वाजल्यापासून सुरु झालेले हे नाटक रात्री ८ वाजले तरी चालू होते. शेवटी पेमेंट अडकल्याने मी रांगोळी करायचा निर्णय घेतला.


रांगोळी पूर्ण झाली, मालिकेचा हिरो रांगोळी काढतोय हा शॉट पण ओके झाला. आता राहिले माझे पेमेंट. मला सांगितले, 'आपके अकाउंट में आयेगा कल।' 


मी ही १० वाजले होते. उशीर झाला म्हणून निघालो. तिथे येण्या-जाण्यासाठी पावसामुळे कॅबचे १६०० रुपये झाले. 


नंतर दुसऱ्या दिवशी अकाऊंटला ३ हजार फक्त आले. २ रांगोळ्यांचे ६ हजार झाले असताना मला फक्त ३ हजार दिले. त्यांना वारंवार फोन करुन ही आजपर्यंत फोन कोणी उचलला नाही.


नंतर ८ दिवसाने मला परत फोन आला, 'सर सेट पे रंगोली करना है।' त्यानंतर त्याला सौम्य भाषेत सांगितले, 'वो सिरीयल का नाम चेंज करो, बडे चुतिये लगते है यह रखो।' असं बोलल्यावर त्याने फोन कट केला.


सर्वात महत्त्वाचे काही रांगोळी कलाकार हुजरेगिरी करण्यासाठी पाचशे सहाशे रुपयांत सेटवर जाऊन रांगोळ्या काढतात व स्वतःची किंमत कमी करुन घेतात. या चॅनल मालिका यांना हेच हवे असते. वेळीच सावध व्हा. अशा फसवणूकी पासून लांब रहा.


कलाकारांना फसवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या या मालिका व या चॅनलवर पूर्ण बहिष्कार टाकला आहे.

Updated Website New Address

 

https://www.aagalavegala.in/

https://www.aagalavegala.in/

आगळं वेगळं  च्या वेबसाईटची Updated new url link आता

https://www.aagalavegala.in/

अशी आहे.

मराठी कॅलीग्राफी इमेजेस डाऊनलोड करा

 

https://nathtel.blogspot.com/


आता आपण माझ्या मराठी कॅलीग्राफी इमेजेस डाऊनलोड करुन घेऊ शकता. डाऊनलोड लिंक्स खाली दिल्या आहेत. 


माझ्या नविन कॅलीग्राफी नियमितपणे पहाण्यासाठी मला फेसबुक   इन्स्टाग्राम वर फॉलो करा.


पोर्टफोलिओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा.


कॅलीग्राफी इमेजेस डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा येथून डाऊनलोड करा

केवळ तीन हजारात Illustrator corel draw यांना पर्यायी सॉफ्टवेअर

 

सध्या ग्राफिक डिझाईनसाठी कोरेल ड्रॉ, अॅडोबी इलस्ट्रेटर आणि फोटोशॉप ही सॉफ्टवेअर्स प्रामुख्याने वापरली जातात. ही सॉफ्टवेअर्स लोकप्रिय झाली तशी या कंपन्यांनी लाईफटाईम लायसेन्सीऐवजी सबस्क्रिप्शन पध्दतीने म्हणजे दरमहा सुमारे १७०० रुपये किंवा वार्षिक सुमारे २०००० रुपये वर्गणी या दराने आकारणी सुरु केली. तर कोरेल ड्रॉ ग्राफिक सूटसाठी दरमहा सुमारे २६०० किंवा वार्षिक ३१००० रुपये आकारते.आणि कोरेल ड्रॉ ग्राफिक सूट साठी लाईफटाईम लायसेन्सी ७५००० हजार रुपयांत मिळते.


ज्यांना व्यावसायिक कारणांसाठी या सॉफ्टवेअर्सचा उपयोग करायचा आहे, त्यांचे उत्पन्नही तसेच असल्यामुळे त्यांना या किंमती परवडतात. आणि काही छोट्या व्यावसायिकांना त्या परवडत नसल्यातरी अधिकृतपणे सॉफ्टवेअर्स वापरण्यासाठी तितके पैसे खर्च करावेच लागतात.


मात्र ज्यांचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी नसून हौसेखातर आहे, आणि त्यांची इच्छा असली तरी ते इतके पैसे या सॉफ्टवेअर्सवर खर्च करु शकत नाहीत. अशा लोकांसाठी माफक किंमतीत या सॉफ्टवेअर्सचे इतर पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी inkscape हे open source असून ते पूर्णतः मोफत उपलब्ध आहे. आणि इतर पर्यायापैकी Affinity Designer हे vector graphic software साडेचार हजार रुपये इतक्या माफक किंमतीत उपलब्ध आहे.


Affinity Designer डाऊनलोड करुन त्याची दहा दिवस मोफत चाचणी घेता येते. मी डाऊनलोड करुन घेतले होते, त्यावेळी त्याची किंमत ३९९९ रुपये इतकी दर्शवत होती. त्यानंतर दहा दिवस पूर्ण होण्याआधीच त्याची किंमत ४४९९ इतकी झालेली दिसली.


पण आता सध्या त्या Serif कंपनीने ब्लॅक फ्रायडे ऑफर मध्ये त्यांच्या सर्व उत्पादनावर ३०% सवलत जाहिर केली आहे. त्यामुळे या सवलतीत Affinity Designer हे केवळ ३०९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकेल. त्यातूनही आणखी एक फायदा करुन घ्यायचा असल्यास buy now च्या खाली scroll down केल्यास तिथे खाली Also available from Microsoft Store अशी एक सूचना दिसेल त्यापुढे Get from Microsoft असा चौकोन दिसेल त्यावर क्लिक केल्यास Microsoft store चे पेज ओपन होईल. तिथे हेच Affinity Designer २७९९.३० इतक्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे दिसेल.


Serif कंपनीच्या Affinity Designer ची काही वैशिष्ट्ये अशी की, याला कमी जागा लागते, कमी वेळात चालू बंद होते, Vector आणि Raster या दोन्ही मोडवर सिंगल क्लिकमध्ये जाता येते, अनलिमिटेड आर्टबोर्ड, Eps, jpeg, pdf, svg, psd, png, tiff, gif इत्यादी सगळ्या प्रकारच्या फाईल फॉरमॅटस् ना सपोर्ट करते. 


याची किंमत ही लाईफटाईम लायसेन्सीची असून, अपडेटस चा सपोर्ट आहे. याच कंपनीची Affinity photo, publisher अशी आणखीही सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. ज्यांना याविषयी कल्पना नाही, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी हा या लेखामागचा हेतू आहे. ज्यांना स्वारस्य असेल त्यांनी दहा दिवसांची मोफत चाचणी आवृत्ती डाऊनलोड करुन घेऊन, वापरुन बघायला हरकत नाही. कंपनीने दिलेली ही खास ३० टक्के सवलत ६ डिसेंबर २०२० पर्यंत सुरु असेल. खाली लिंक दिली आहे.


सदर सॉफ्टवेअर विषयी ट्युटोरियल्स युट्युबवर उपलब्ध आहेत.

https://affinity.serif.com/en-us/

कोरोना : प्रत्येकाचे टेन्शन वेगळे




आज सकाळी सकाळीच सुरेशचा व्हिडिओ कॉल आला. मी विचारात पडलो, की बुवा याने आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल कसा काय केला?
बोला सुरेश शेठ, आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल? काय विशेष?
गरीबी फार वाईट असतेनिराशेने आडवी मान हलवीत सुस्कारा सोडत तो म्हणाला.
का रे काय झालं? कुणाबद्दल बोलतोय तू? त्याचं हे रुप मला नविनच होतं.
आता मी अजून दुसऱ्या कुणाबद्दल बोलणार? माझ्याबद्दलच बोलतोय.
काय सुरेश शेठ, आज कुणी भेटलं नाही का? गरिबी कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे का?
करा चेष्टा, इथं मी काय दुःखात आहे, ते राहिलं बाजूलाच आणि... जाऊ द्या गरिबांची थट्टा करायची जगाची रितच आहे म्हणा. पुन्हा सुस्कारा सोडत सुरेशच्या तोंडातून निराश सूर बाहेर पडले.
हे बघ सुरेश, थट्टाबिट्टा काही नाही, तुला काय म्हणायचयं ते मला नाही समजलं. जरा स्पष्ट बोलशील का? असं कोड्यात बोलू नको गड्या.
आता तुझ्यापासून काय लपवायचयं? तुला सगळं सविस्तरच सांगावं लागेल.
तेच म्हणतोय मी काय झालं ते स्पष्ट सांग.
सांगतो सांगतो ऐक नीट. या कोरोनामुळे बाजारपेठा बंद होतील याची कुणकुण मला आधीच लागली होती. पण खात्री वाटत नव्हती, तरीही मी रविवारी अडचण येऊ नये म्हणून एक आधीच आणून ठेवली होती.
काय आणून ठेवली होती?
अरे तुला तर माहित आहेच ना, मी फक्त रविवरीच एक क्वॉर्टर घेतो ते. त्यामुळे मी माझी एक क्वॉर्टर आधीच घरी आणून ठेवली होती.
सुऱ्या चक्क तू घरी आणून ठेवली? आणि वहिनी कसं काय काही बोलल्या नाहीत तुला?
बोलली रे, पण मी तिला समजावलं, मी या आधी कधी घरी आणलीय का? मी कधी घरी घेतो का? फक्त एवढ्या बंदमुळेच आणलीय. मग मात्र त्यावर ती काही बोलली नाही.
मग थोडासा पॉज घेऊन सुरेश पुढे बोलू लागला, मोदीजींनी २२ तारखेला रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू जाहिर केला. मग मी विचार केला म्हटलं ठीक आहे, रात्री ९ नंतर दर रविवारप्रमाणे बाहेरच जाता येईल, घरी घ्यायला नकोच. आणि जी एक आणून ठेवलेली आहे,  ती पडेना का तशीच.
मग अडचण कुठे आली? मी त्याला विचारले.
अरे काय सांगू तुला, अचानक ३१ मार्च पर्यंत बाजारपेठा बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश शुक्रवारी संध्याकाळी मला व्हॉटसअपवर वाचायला मिळाला. तसे मी कॅलेंडर बघितले आणि आपण एकच क्वॉर्टर आणून चूक केली असे वाटायला लागले. म्हणून मग आणखी एक क्वॉर्टर २९ तारखेच्या रविवारसाठी मी आणून ठेवली.
भागलं की मग तुझं तर लेका, तुझा कोटा तर कंप्लेट.
कशाचा कोटा कंप्लेट बाबा? २२ तारखेला रात्री ९ वाजता संपणारा जनता कर्फ्यू सोमवारी पहाटे पाचपर्यंत वाढविल्याचे समजले. म्हणून मग कर्फ्यू संपल्यावर बाहेर जाण्याचा केलेला प्लॅन  मी कॅन्सल करुन त्या रविवारी पहिली आणून ठेवलेली एक क्वार्टर संपवून टाकली.
मग अजून एक शिल्लक आहेच की तुझ्याकडे.
अरे बाबा एक शिल्लक आहे हीच तर खरी ट्रॅजेडी आहे.
एक शिल्लक आहे हीच ट्रॅजेडी? मी नाही समजलो.
अरे पंतप्रधानांनी २४ तारखेच्या मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देशच लॉक डाऊन केल्याची घोषणा केली. आणि ही घोषणा होण्यापूर्वीच दोनपैकी एक क्वॉर्टर तर मी आधीच संपवली होती. आणि आता लॉक डाऊनमुळे कुठे मिळणंही मुश्कील आहे. आता जी एक शिल्लक आहे, त्यात मला पुढचे तीन रविवार कसे भागवायचे हा प्रश्न पडलाय. शेवटी सुरेशने त्याचा खरा प्रॉब्लेम क्लिअर केला.
हात्तीच्या एवढचं ना? दर रविवारी सिक्स्टिचा एक पेग प्रमाणे तीन रविवारमध्ये राहिलेली एक क्वॉर्टर संपवून टाक.  कशाला टेन्शन घेतोस? मी माझे गणितीय ज्ञान सार्थकी लाऊन त्याला सल्ला दिला.
अरे तुला इथे गंमत सुचायला लागलीय? पण २१ दिवसानंतर जर हे लॉक डाऊन संपलं नाही तर अजून किती दिवस मला आहे त्या एक क्वॉर्टरमध्ये  काढावे लागतील? पोलिओ डोसप्रमाणे एक एक ड्रॉप जिभेवर टाकून रविवार काढण्याच्या कल्पनेनेच माझं टेन्शन वाढायला लागलयं. आणि तुला मस्करी सुचायला लागलीयं.  जाऊ दे मी तुला फोन केला तेच चुकलं ठेवतो फोन मी.
आणि मी पुढे काही बोलायच्या आतच आमच्या चिंताग्रस्त मित्राने फोन कट केला सुध्दा.
l l l

मोफत म्युझिक प्लेअर अँड्रॉईड अॅप

अँड्रॉईड फोन वापरणाऱ्या संगीतप्रेमीसाठी एक खूप चांगले मोफत म्युझिक प्लेअर अॅप उपलब्ध आहे. Musicolet Music Player या नावांने हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करुन घेता येईल. हे अॅप ऑफलाईन असल्याने स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या म्युझिक फाईलमधूनच म्युझिक प्ले करते. इंटरनेट कनेक्शन अथवा डाटा वापराच्या परवानगीची याला गरज लागत नाही. या महत्वाच्या वैशिष्ठ्याव्यतिरिक्त या अॅपची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. 


https://nathtel.blogspot.com/2019/08/blog-post-musicolet-best-free-music-android-app.html



  • Musicolet is simple, light yet powerful music player with all essential music playing features with some advance features like...
  • Multiple Queues
  • Simple GUI with Minimalistic design & Easy navigation
  • Tag editor+: Can edit tags and album-arts of multiple songs at once.
  • Move/Copy songs, Rename folders directly in app
  • Folder browsing
  • Powerful Equalizer: Separate presets and settings for Speakers, Headphones, Bluetooth etc.
  • Gapless playback
  • Earphone controls
  • Embedded Lyrics + LRC support
  • Sleep timers 2 types: 1) close app after hh:mm time or 2) close app after N songs.
  • Add shortcuts of any album/artist/folder/playlist to your HomeScreen (Launcher) app.
  • Stunning Widgets
  • Lock Screen (with controls, Queue and Lyrics)
  • Android Auto support 
  • From your 'Android Auto' enabled car, you can control music and access your playlists, queues, folders and whole music library.
  • Change notifications appearance
  • You can also enable Fast-Forward and rewind buttons in notifications from settings.
  • Light and dark themes
  • Backup and Restore
  • Automatic and Manual backups. Restore settings, playlists, play-counts from any backup anytime on any device.


  • Musicolet अॅपची अजून दोन वैशिष्टे म्हणजे ते मोफत असूनही नो अॅडस म्हणजे जाहिराती शिवाय उपलब्ध आहे. आणि अभिमानाची गोष्ट अशी की हे एक भारतीय अॅप आहे.
  • या अॅपचे दहा लाखाहून अधिक डाऊनलोड झालेले आहेत आणि पासष्ट हजाराहून अधिक वापरकर्त्यांनी याला 4.7 इतके रेटींग्ज या अॅपला दिलेले आहेत.
  • Musicolet हे अॅप आपण गुगल प्ले स्टोअरवरु किंवा या लिंकवर क्लिक करुन देखील डाऊनलोड करुन घेऊ शकता.



shree jyotiba aarati | श्री ज्योतिबा आरती

https://youtu.be/7z_g0ctmhp0

।। श्री ज्योतिबा आरती ।।


आज गुरुवार दि. 13 सप्टेंबर 2018 भाद्रपद शु्ध्द 4 म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या सुमुहुर्तावर ...

वै. प्रल्हाद विष्णू कारंजकर, यांनी रचलेली "श्री ज्योतिबा आरती" ही ध्वनिमुद्रित भक्तिरचना व्हिडिओ स्वरुपात प्रकाशित करताना अतिशय आनंद होत आहे. या लिंकवर क्लिक करुन आपण युट्युबवर हा व्हिडिओ पाहू शकता. तसेच याची व्हिडिओ व ऑडिओ डाऊनलोड लिंक युट्युबवरील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावरुन आपण ही आरती डाऊनलोड करुन घेऊ शकता.

।। श्री ज्योतिबा आरती ।।

जयदेव जयदेव जय ज्योतिर्लिंगा।
आरती ओवाळू भावार्ती ओवाळू तुज अश्वस्वारा ।।ध्रु।।

चैत्र शुद्ध पौर्णिमेसी यात्रा हो भरती।
तव भक्त तुमचे चरणांसी येती।
चांगभले चांगभलेचा जयघोष करिती।
त्यांची सर्व चिंता तुची हरिसी।।१।। जय ।। 

अश्वाचे वाहन तुम्हां शोभते छान। 
जन्मोजन्मी लाभो तुमचे हो ध्यान। 
गुलाल खोबरे उधळुनी भक्त। 
दर्शन घेती तुमचे भान हरपुनी मुक्त।।२।। जय।। 

भक्तजन मेळा हो पालखीस हजर। 
सर्व मुखी होय तुमचा गजर। 
कंठी शोभे तुमचे नवरत्न हार। 
हाती तुमचे त्रिशूळ डमरु तलवार।।३।। जय।।

रचना : वै. प्रल्हाद विष्णू कारंजकर, बार्शी (जि. सोलापूर)
स्वर व संगीत : श्री विनोदजी शेंडगे
ध्वनिमुद्रण : अनाहत स्टुडिओ, पंढरपूर

ऑनलाईन शॉपींग; सुरक्षितता व दक्षता - 2

https://nathtel.blogspot.com/2017/11/2-safe-online-shopping.html


यासाठी ऑनलाईन शॉपींग करताना ती, घाईगडबडीने न करता थोडीशी जागरुकतेने करण्याची गरज आहे. जी वस्तू आपण पसंत केलेली आहे, त्या वस्तूच्या विक्रेत्याच्या नावाची लिंक, त्या वस्तूच्या वेबपेजवर दिलेली असते. त्यावर क्लिक केल्यास संबंधित विक्रेत्याच्या पेजवर जाता येते. तेथे तो किती कालावधीपासून या स्टोअरवर विक्रेता आहे, कुठल्या शहरांतील आहे, त्याने आजपर्यंत येथे किती विक्रीचे व्यवहार केलेले आहेत याबद्दल माहिती मिळते.

तसेच ज्या ग्राहकांनी त्या विक्रेत्याकडून खरेदी केलेली आहे, त्या ग्राहकांनी त्याला दिलेले मानांकन (Rating) आणि त्यांच्या प्रतिक्रियाही उपलब्ध असतात. ऑर्डर प्लेस करण्यापूर्वी हे सगळे काळजीपूर्वक पहावे. यावरुन त्या विक्रेत्याच्या विश्वासार्हतेची कल्पना यायला मदत होते. जर त्या विक्रेत्याबद्दलचे जास्त फिडबॅक निगेटीव्ह स्वरुपाचे असतील तर त्या विक्रेत्याकडून ती वस्तू खरेदी न केलेली बरी. त्याऐवजी ती वस्तू दुसऱ्या विक्रेत्याकडे शोधण्याचा प्रयत्न करावा.

ऑनलाईन खरेदी करत असलेल्या वस्तूबद्दल वेबस्टोअर काही हमी देत आहे का तेही पहावे. उदाहरणार्थ अमेझॉनवर ज्या वस्तूपुढे अमेझॉन कंपनीचे aFulfilled असे चिन्ह दिसेल त्या वस्तू अमेझॉन Fulfilment Centers मार्फत स्टोअर, पॅक आणि डिस्पॅच केल्या जातात, आणि अमेझॉनकडून डिलीव्हरी, कस्टमर सर्व्हिस व रिटर्नस बाबतचे व्यवहार हाताळले जातात असा त्या चिन्हाचा अर्थ होतो.

याचप्रमाणे फ्लिपकार्टवर fAssurd, ईबेवर EBayGuarantee, स्नॅपडीलवर SnapdealGuarantee अशी वस्तूपुढे दिसणारी चिन्हे थोड्याफार फरकाने त्या वस्तूची विक्री, डिलीव्हरी, कस्टमर सर्व्हिस, रिटर्नस् याबाबत वेबस्टोअर हमी घेत असल्याचे दर्शवितात. त्यामुळे असे वेबस्टोअरचे पाठबळ असणाऱ्या वस्तू निवडण्याचा शक्यतो प्रयत्न करावा.

ü ऑनलाईन शॉपींग करताना याकडे लक्ष द्या

·   ऑनलाईन शॉपींगसाठी बऱ्याचदा काही ऑफर्स ईमेलद्वारे मिळत असतात. त्यापैकी काही ईमेल त्या कंपनीच्या नावाशी साधर्म्य साधणारे असतात. पण लक्षपूर्वक पाहिल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाईटचा पत्ता व याप्रकारच्या फिशिंग मेलमध्ये असलेला पत्ता वेगवेगळा आहे हे लक्षात येते.अशा अनधिकृत ईमेलच्या माध्यमातून आकर्षक ऑफर्स देत असल्याचे भासवून, त्यामध्ये दुसरीकडे रिडायरेक्ट होणाऱ्या काही लिंक्स दिलेल्या असतात. त्यावर कधीही क्लिक करु नका. अशा लिंक्स असुरक्षित असतात, व त्यामुळे तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, नेट बँकींगचे युजर आयडी, पासर्वड यासारखी गोपनीय माहिती धोक्यात येऊ शकते.
·     अशा प्रकारचा धोका टाळण्यासाठी वेब ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये पाहिजे त्या ऑनलाईन शॉपींग वेबस्टोअरचा पत्ता टाईप करुन त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे हा सुरक्षित मार्ग आहे.
·   ऑनलाईन शॉपींग करताना ज्यावेळेस ऑनलाईन पेमेंट करण्याचा टप्पा येतो, तेव्हा त्यावेळी वेब ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये सरुवातीस कुलूपाचे चिन्ह (Padlock) आणि त्यापुढे https:// दिसत असल्याची खात्री करा. आणि मगच पेमेंटची प्रक्रिया पुढे सुरु करा. https आणि पॅडलॉक चिन्ह म्हणजे वेबपेज सुरक्षित असल्याचे निदर्शक आहे.
·   आपल्या स्मार्टफोनवर आणि संगणकावर नेहमी एक चांगले अपडेटेड अँटीव्हायरस कार्यान्वित असू द्या. आपले बँक खाते क्रमांक, डेबिट, क्रेडिट कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक, एटीएम कार्डचा पिन क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, बँक खात्यांचे युजर आयडी, पासवर्ड यासारखा संवेदनाशील व गोपनीय डाटा संगणकावर व मोबाईलमध्ये कधीच स्टोअर करुन ठेऊ नका, आणि इतरांनाही सांगू नका.
·    ऑनलाईन शॉपींग करतेवेळी वस्तूचे शिपींग चार्जेसही काळजीपूर्वक बघा. नाहीतर एकीकडे वस्तूची कमी किंमत दाखवून शिपींग चार्जेस अधिक आकारले जातात. त्यामुळे मग त्या वस्तूची किंमत आधी महाग वाटलेल्या दुसऱ्या विक्रेत्या इतकीच किंवा काहीवेळा त्यापेक्षा अधिकही पडण्याची शक्यता असते.
·    ऑनलाईन वस्तू खरेदी करताना शिपींग चार्जेस सोबत, वस्तूची विक्रीपश्चात सेवा, वस्तू बदलून मिळणे, पसंत न पडल्यास परत घेतली जाणे यासंदर्भातील नियम व अटी काळजीपूर्वक वाचूनच खरेदी करा.
·    काही वस्तूवर सवलत जाहीर केलेली असते, ती जाहीर केलेली सवलत खरी आहे का, याची खात्री करुन घ्या.  कारण बऱ्याच वेळेस एखाद्या वस्तूची किंमत ही मूळ किंमतीपेक्षा अधिक फुगवून नंतर ती सवलतीमध्ये कमी केली आहे, असे भासवले जाते. यासाठी स्थानिक बाजारपेठेत आणि इंटरनेटवर इतर कंपन्यांच्या वेबस्टोअरवर जाऊन त्या वस्तूच्या मूळ किंमती बद्दल खात्री करा.
·   त्यासाठी एखादी वस्तू वेगवेगळ्या संकेतस्थळांवर कोणकोणत्या किंमतीत उपलब्ध आहे, हे दाखविणारी काही संकेतस्थळे आहेत. त्यांचाही तुलना करण्यासाठी उपयोग करा.
·       शक्य असेल त्याठिकाणी C.O.D. म्हणजेच कॅश ऑन डिलेव्हरी पेमेंटचा पर्याय निवडा.
·       आपले पासवर्ड ठराविक कालावधीनंतर आणि नियमितपणे बदलत रहा.
·       ऑनलाईन शॉपींग करताना अपरिचित व असुरक्षित आणि सार्वजनिक वायफायचा वापर टाळा.
·       सायबर कॅफे सारख्या सार्वजनिक ठिकाणच्या संगणकांचा वापर ऑनलाईन शॉपींगसाठी करणे टाळा.
·       वस्तूची डिलेव्हरी मिळताना त्याचे पॅकींग सुस्थितीत आहे की नाही याची खात्री करुन घ्या.

ü सर्वात शेवटी एक महत्वाची गोष्ट

ऑनलाईन शॉपींग केल्यानंतर आपणांकडे आलेले वस्तूचे पॅकींग उघडणे, त्यातील मुख्य वस्तू व सोबत आलेल्या इतर वस्तू बाहेर काढून त्या तपासून बघण्याच्या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईलमध्ये कॅमेरा असतोच, त्यावरुन सुध्दा असे चित्रण सहज करता येणे शक्य आहे.

चित्रणाची सुरुवात करताना पॅकींगवरील पाठविणाऱ्या कंपनीचे नाव, आपले नाव व पत्ता, तसेच सर्व बाजूने पॅकींग उत्तम स्थितीत आहे ते कॅमेऱ्यासमोर दाखवून करावी. नंतर ते पॅकींग उघडून त्यातील मुख्य व इतर वस्तूंची प्रत्यक्ष स्थिती चित्रीत करावी.

समजा आपण एखादा मोबाईल खरेदी केला असेल तर, त्या पॅकींगमधील मुख्य वस्तू म्हणजे हँडसेट व त्यासोबतच्या इतर वस्तू म्हणजे चार्जर, केबल, हेडफोन, बॅटरी इत्यादी अक्सेसरीज. याचे चित्रण केल्यानंतर हँडसेटमध्ये बॅटरी बसवून तो ऑन करुन योग्य प्रकारे चालतो की नाही? हे दाखविण्यापर्यंत तपशीलवार चित्रण करावे.

ही सर्व दक्षता घेण्याचे कारण असे की, कदाचित पॅकींगच्या आतील वस्तू खराब, तूटफूट झालेली, किंवा नादुरुस्त अवस्थेत आलेली असल्यास, ती तशी मिळाली हे सिध्द करण्यासाठी पुरावा म्हणून या रेकॉर्डिंगचा उपयोग होऊ शकेल.

ऑनलाईन शॉपींग करताना अशाप्रकारे योग्य ती दक्षता घेऊन चौकसपणे खरेदी केल्यास ऑनलाईन शॉपींगचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.

§§§

ऑनलाईन शॉपींग; सुरक्षितता व दक्षता - 1

https://nathtel.blogspot.com/2017/11/1-safe-online-shopping.html

शॉपींग म्हणजे सगळ्यांचाच अत्यंत आवडीचा विषय. आणि त्यासाठी प्रत्येकाला कितीही फिरावे लागले तरी त्याबद्दल त्यांची काहीच कुरकुर नसते. आणि जर हेच शॉपींग ऑनलाईन होणार असेल तर मग काय, आनंदी आनंदच. कुठेही न फिरता घरात बसून अनेक वेबस्टोअर्सना भेटी देत, हवी ती मनपसंत वस्तू शोधून खरेदी करण्याचा आनंद काही औरच. मात्र असे ऑनलाईन शॉपींग काही गोष्टींची दक्षता घेऊनच करायला पाहिजे, तरच ते आनंददायक ठरु शकते, अन्यथा या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता असते. ऑनलाईन शॉपींग करण्याआधी ऑनलाईन शॉपींगचे कोणते फायदे आहेत हे आपण पहाणार आहोत. आणि त्यानंतर ऑनलाईन शॉपींग करताना काय काळजी घ्यावी याचीही माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

ü ऑनलाईन शॉपींगचे फायदे

ऑनलाईन शॉपींग करण्याचे काही फायदे नक्कीच आहेत. ऑनलाईन शॉपींगचा सर्वात पहिला फायदा असा की,  बाजारपेठेत अनेक ठिकाणी प्रत्यक्ष न फिरता, सेल्समनचा त्रासिक चेहरा न पहाता, किंवा त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या न बघता एका जागेवर बसून शॉपींग करता येते. प्रत्यक्ष कुठेही न फिरता शॉपींग करता येते याचा अर्थ एकाच वेबस्टोअर वरुन खरेदी करावी लागते असा नाही. तर अनेक वेबस्टोअर्सना भेटी देऊन आपल्या पसंतीने शॉपींग करता येते.
ऑनलाईन शॉपींगचा दुसरा फायदा असा आहे की, हवी असलेलीच वस्तू शोधता येते आणि खरेदी करता येते. काही प्रसंगी स्थानिक बाजारपेठेत आपल्याला हवी असलेली एखादी वस्तू मिळत नाही, त्यामुळे नाईलाजाने तेथे उपलब्ध असलेली त्याच प्रकारची दुसरी पर्यायी वस्तू खरेदी करण्याची वेळ येते. अशी वेळ ऑनलाईन शॉपींग करताना येत नाही. तर हवी तीच वस्तू खरेदी करता येते.

ऑनलाईन शॉपींगचा तिसरा फायदा हा आहे की, एखाद्या वस्तूचे विविध नमुने पहायला मिळतात. त्यामुळे निवडीला भरपूर वाव मिळतो. आणि म्हणूनच नाईलाज या शब्दाला येथे शिरकाव नाही. थोडक्यात म्हणजे भरपूर व्हरायटी पाहून खरेदी करण्याची संधी मिळते.

पण यासारख्या काही फायद्यासोबतच ऑनलाईन शॉपींगमध्ये एक तोटाही आहे, तो म्हणजे नो बार्गेनिंग. त्यामुळे ज्यांना किंमतीमध्ये घासाघीस करण्याची सवय आहे, त्यांची ऑनलाईन शॉपींगमध्ये गैरसोय होते. ऑनलाईन शॉपींगमध्ये किंमतीत घासाघीस करता येत नाही. पण वेळोवेळी सुरु असणाऱ्या विविध ऑफर्सचा लाभ मात्र नक्कीच घेता येतो.
ऑनलाईन शॉपींग करण्यामध्ये असलेले काही फायदे आपण पाहिले. आता ऑनलाईन शॉपींग करताना कोणती दक्षता घ्यावी या विषयी काही महत्वाची माहिती बघू.

ü गरज असणाऱ्या वस्तूंचीच खरेदी करा

ऑनलाईन शॉपींग करताना प्रत्येक वेबस्टोअरवर अतिशय आकर्षक अशा एचडी (High Definition) प्रकारच्या  ईमेजेस ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वापरलेल्या असतात. ज्या प्रकारे मोठ्या शोरुम्समध्ये प्रदर्शित केलेल्या वस्तू ग्राहकांची नजर खेचून घेण्याचे काम करत असतात. नेमके तेच काम या ईमेजेस वेबस्टोअरवर करत असतात. त्या ईमेजेस पाहून हे खरेदी करु की ते खरेदी करु असा मोह झाल्याशिवाय रहात नाही. पण येथे मनावर थोडासा संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तूंचीच खरेदी करावी. गरज नसतानाही एखादी वस्तू केवळ फोटोमध्ये चांगली दिसली म्हणून, किंवा सवलतीत मिळत आहे म्हणून खरेदी करण्याचा मोह टाळावा.

ü कोणत्या वस्तूंचे ऑनलाईन शॉपींग करणे टाळावे?

ऑनलाईन शॉपींग करणारे हा प्रश्न हमखास विचारतात. फ्रीज, टीव्ही, वॉशींग मशीन यासारख्या इलेक्ट्रॉनीक्स वस्तू विक्रीपश्चात सेवा मिळण्याचे दृष्टीने स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केल्यास अधिक सोईस्कर ठरतात. पण त्यातूनही  हवे असणारे एखादे विशिष्ट मॉडेल स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध नसेल, तर ते ऑनलाईन खरेदी करायला हरकत नाही. मात्र खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूसाठी विक्रीपश्चात सेवा स्थानिक पातळीवर मिळण्यात काही अडचण तर येणार नाही ना? याची आधी चौकशी करावी आणि मगच ती वस्तू ऑनलाईन खरेदी करावी.

समजा एक गॅस स्टोव्ह (गॅस शेगडी) ऑनलाईन खरेदी केला, आणि तो काही काळानंतर बिघडला किंवा त्यासाठी विक्रीपश्चात सेवेची गरज पडली तर, तो आमच्याकडून घेतला नाही या कारणास्तव स्थानिक विक्रेता जर त्यासाठी अधिक सेवा शुल्क आकारणार असेल तर अशी वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यात अर्थ नाही. याबाबतचा विचार ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वीच करणे गरजेचे आहे.

ज्या वस्तू घेतल्यानंतर काही वेळेस त्या बदलून घेण्याचा प्रसंग येतो अशा वस्तू ऑनलाईन खरेदी करु नयेत. उदाहरणार्थ कपडे, पादत्राणे यासारख्या वस्तूंची मापे कमी किंवा अधिक झाल्यास ते बदलून घेण्याचा प्रसंग येऊ शकतो.

समजा एखाद्याने एम (Medium) साईजचा टीशर्ट नेहमी व्यवस्थित बसतो म्हणून त्या साईजचा टीशर्ट ऑनलाईन खरेदी केला. तरीही तो टीशर्ट त्याला नेहमीप्रमाणे बसेलच असे नाही. टीशर्टवर लेबल जरी एम साईजचे असले तरी, वेगवेगळ्या निर्मात्यानुसार साईजमध्ये फरक येऊ शकतो. आणि त्यामुळे अर्थातच फिटींगमध्ये सुध्दा फरक पडतो. त्याचप्रमाणे जीन्स पँट व इतर कपड्यांच्या बाबतीत सुध्दा प्रत्यक्ष फिटींग बघून स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करणेच अधिक सोईस्कर ठरते.

स्थानिक बाजारपेठेतून जर अशी वस्तू खरेदी केलेली असेल तर, ती स्थानिक दुकानदाराकडून बदलून घेण्यात काहीच अडचण येत नाही. पण जर ऑनलाईन खरेदी केलेली असेल तर, बदलून मिळण्यासाठी ती वस्तू पुन्हा कुरियरने त्या विक्रेत्याकडे परत पॅक करुन पाठविणे, व पुन्हा दुसरी मागविणे ही बाब त्रासदायक व खर्चिकही ठरते. क्वचित प्रसंगी बचत होण्याऐवजी जास्त किंमतसुध्दा चुकवावी लागू शकते. त्यामुळे अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करणे केव्हाही उत्तम.

त्याचबरोबर ज्या वस्तू प्रत्यक्ष पाहून आणि हाताळून खरेदी करणे गरजेच्या असतात, अशा वस्तूंची ऑनलाईन शॉपींग करु नये. यासाठी उदाहरण वस्त्रप्रावरणांचे घेता येईल. कापडाचा दर्जा (Quality), पोत (Texture), रंग (Colour), कपड्याला स्पर्श केल्यानंतर येणारी अनुभूती (Feeling) यासाठी वस्त्रप्रावरणे हा प्रकार प्रत्यक्ष हाताळून पहाण्याची गरज असते.
वेबस्टोअरवर पाहिलेल्या आकर्षक फोटोवरुन या प्रकारच्या वस्तूंची ऑनलाईन शॉपींग करणे काही प्रसंगी मनस्तापदायक सुध्दा ठरु शकते. कारण फोटोवरुन दर्जा, पोत, रंग आणि फिलींगचा अनुभव घेता येत नाही. त्यामुळे फोटोत पाहिलेली वस्तू प्रत्यक्ष मिळाली तरी, त्याचा रंग, दर्जा, पोत हा तपशीलात वर्णन केल्याप्रमाणेच किंवा फोटोत दिसल्याप्रमाणेच असेल असे नाही.

ü ऑनलाईन शॉपींगमध्ये फसवणूक होते का?

या प्रश्नाचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही प्रकारे देता येईल. ऑनलाईन शॉपींगमध्ये खात्री आणि फसवणूक या एकच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. ऑनलाईन शॉपींगमध्ये फसवणूक होतच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आपणांस माहित असेलच की, आपण ज्या नामवंत कंपनीच्या वेबस्टोअरवरुन ऑनलाईन शॉपींग करत असतो, ती कंपनी स्वतः वस्तू विक्री करत नाही, तर त्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरुन अनेक विक्रेते आपला माल विक्री करत असतात. ग्राहक आणि विक्रेते यांना एकत्रित आणण्यासाठी कंपनीच्या ब्रँडनेमचा प्लॅटफॉर्म म्हणून उपयोग केला जातो.

उडदामाजी काळेगोरे या म्हणीप्रमाणे, येथे असणाऱ्या अनेक प्रकारच्या विक्रेत्यामधील, काही अप्रामाणिक व  नितीमत्तेची चाड नसणाऱ्या काही विक्रेत्यांच्याकडून वेळप्रसंगी हलक्या दर्जाच्या वस्तूंची विक्री, फोटोत व तपशीलात दाखविल्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळ्याच वस्तूंची विक्री असे फसवणूकीचे प्रकार घडतच असतात.


ते यापूर्वीही घडले आहेत आणि पुढेही घडत रहातील. संबंधित वेबस्टोअर अशा विक्रेत्यांवर काही कारवाई करत असेल किंवा नसेल हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण खरेदीदाराला प्रत्यक्ष माल बदलून मिळेपर्यंत किंवा त्याची नुकसान भरपाई मिळेपर्यंत मनस्ताप सहन करावा लागतो हे मात्र खरे.

विविध टूल्सचे एकच अॅप

https://youtu.be/dPpRib3mXfk


आपल्या स्मार्टफोनमध्ये आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या टूल्ससाठी अनेक वेगवेगळी अॅप्स डाऊनलोड करुन आपण आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करत असतो. त्यामुळे स्मार्टफोनच्या स्टोअरेजमधील बरीच जागा कमी होत असते.

पण आता असे एक अॅप आहे, की ज्यामध्ये नोटपॅड, भाषांतर करण्यासाठी ट्रान्सलेटर, रेकॉर्डर, मॅग्निफायर, कोड स्कॅनर, क्लिनर, बॅटरी सेव्हर, करन्सी व युनीट कनव्हर्टर, हर्ट रेट मॉनीटर, मॅप, साऊंड मीटर इत्यादी आवश्यक अशी तीसहून अधिक टूल्स एकाच अॅप मध्ये समाविष्ट केलेली आहेत. आणि त्या अॅपची फाईल साईजही सुमारे सहा एमबी इतकी कमी आहे.

या अॅपबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा.

मोफत अॅप्समधील जाहिराती कशा काढाव्यात

https://youtu.be/5PSytuE8vLE

अँड्रॉईड मोबाईल फोनमधील बहुतांश वापरात येणाऱ्या मोफत अॅप्समध्ये अॅडस असतात. आणि त्या पहाणे किंवा अॅप वापरताना त्यांचा अडथळा येणे कोणालाही आवडत नाही. तर या अॅडस कशा प्रकारे त्या अॅपमधून काढता येतील? याची माहिती देणारा How to remove ads from apps हा व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा.