August 2011 | आगळं! वेगळं !!!

"आगळं! वेगळं!!!"ची वर्षपूर्ती

आज माझ्या "आगळं! वेगळं!!!" या ब्लॉगला १ वर्ष पूर्ण झालं. बरोबर १ वर्षांपूर्वी म्हणजे ३१ ऑगस्ट २०१० रोजी मी हा ब्लॉग सुरु केला. मी ज्यावेळी ब्लॉग सुरु केला त्यावेळी मी ही ब्लॉगबाबतच्या प्रत्येक बाबीविषयी नवखाच होतो. जिज्ञासेने प्रत्येक गोष्ट जाणून घेत प्रगती करत राहिलो. कोणतीही व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थीच असते, असे मी मानतो. अजूनही शिकण्यासारखे पुष्कळ काही आहे, त्यामुळे अजूनही विद्यार्थी होऊन शिकतच राहायचे आहे.

भारताच्या ६५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आता कुठे आहेत युवराज?

मंगळवार दि.९ ऑगस्ट २०११ रोजी म्हणजेच क्रांतीदिनी मावळ भागातील जलवाहिनीवरून एक्सप्रेस हायवेवर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करत तीन आंदोलकांना टिपले. क्रांतिदिनाचे हे दुर्दैव म्हणायचे. या ठार झालेल्या आंदोलकांना सर्वप्रथम श्रध्दांजली!

भारताची 'पत'ही धोक्यात

=> अमेरिकेला सर्दी, जगाला शिंका; सर्व शेअर बाजार आपटले; भारतात पाच कोटींचा फटका
  • अखेर अमेरिका 'गारठली'

'कॅग'चा अहवाल संसदेत सादर


=> संसदेला तुमची गरज नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा कलमाडींना दणका, १ लाखाचा दंड

  • पण मला संसदेची आहे ना... 

अण्णांचे आंदोलन भरकटणार तर नाही?

सोळा ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अण्णांच्या उपोषणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. आणि विविध प्रसारमाध्यमातून आपण ती पहात आहोत. या सर्व चर्चेतून वारंवार अण्णांचे हे आंदोलन 'भरकट'णार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चर्चेत सहभागी होणारी तज्ञ, विचारवंत मंडळी हे आंदोलन चुकीच्या मार्गाने जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताहेत.

रुतला विकासाचा गाडा

=> अधिवेशनापूर्वीच खडाजंगी, भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान आक्रमक
  • कुणाच्या भ्रष्टाचाराबाबत? भाजपच्या...?