कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय मराठीतून टाईप कसे करावे | आगळं! वेगळं !!!

कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय मराठीतून टाईप कसे करावे

संगणकावर मराठीतून टाईप कसे करावे

[कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय]

photo credit: alcomm via photo pin cc

संगणकावर मराठीतून टाईप करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी ऑनलाईन हा पर्याय इंटरनेट सुरु असल्याशिवाय वापरता येत नाही, त्यामुळे तो खर्चिक आहे. दुसऱ्या ऑफलाईन पर्यायच्या माध्यमातून संगणकावर मराठीतून टाईपिंग करायचे असेल तर गुगल मराठी इनपुट, बराहा, गमभन यासारख्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सची मदत घ्यावी लागते. पण यापैकी एकही सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता संगणकावर मराठीतून टाईपिंग करण्याची एक सोपी पध्दतसुध्दा आहे, जी आज आपण येथे पहाणार आहोत.

ही पध्दत वापरण्यासाठी येथे विंडोज 7 प्रणालीचा विचार केलेला आहे व मी पूर्वीपासून INSCRIPT हा किबोर्ड वापरत असल्यामुळे तो पर्याय येथे निवडला आहे.

Start Menu वर क्लिक करुन Control Panel ओपन करा.

त्यातील Clock, Language, and Region या पर्यायातील Change keyboards or input methods हा उपपर्याय निवडा.
त्यावर क्लिक करताच Keyboard and Language या Tab वरील change keyboards हे बटन आपणांस दिसेल त्यावर क्लिक करा.

नंतर उघडणाऱ्या Genral या Tab वरील  Add बटनवर क्लिक करा. तेथे दिसणाऱ्या भाषेच्या लिस्टमधील Marathi(India) च्या सुरवातीस दिसणाऱ्या + या बटनावर क्लिक करा व त्याखालील keyboard या पर्यायाखालील Devnagari-INSCRIPT च्या सुरुवातीस दिसणारा बॉक्स चेक करून हा पर्याय निवडा. या किबोर्डचा नमुना आपण  Preview वर क्लिक करुन पाहू शकता  आता Ok वर क्लिक करा.

नंतर Apply व Ok वर क्लिक करा.






याप्रकारे सेटींग्ज केल्यानंतर आपणाला टास्कबारवर EN बटन दिसू लागेल, आणि त्यावर क्लिक केल्यानंतर EN English (United States) व त्याखाली MA Marathi (India) असा दुसरा पर्यायही दिसू लागेल.



बस आता आपण सेटींग पूर्ण केलेली आहे. आता मराठीतून टाईप करण्यासाठी नोटपॅडची एक नविन फाईल ओपन करा. नंतर टास्कबारवरील मराठी भाषेचा पर्याय निवडा आणि सरळ मराठीतून टाईप करायला लागा. नंतर हा टाईप केलेला मजकूर कॉपी करुन तुम्ही तुमच्या ब्लॉगपोस्टवरील नविन पोस्टच्या विंडोमध्ये पेस्टही करु शकता.

नोटपॅडची ही फाईल सेव्ह करताना Encoding समोरील UTF-8 हा पर्याय निवडा.

या प्रकारे आपण आपल्या संगणकावर कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता मराठीतून ऑफलाईन पर्यायाव्दारे टायपिंग करु शकतो.

3 Comments:

  1. अरे हे तर मला माहीतच नव्हते ..!

    ReplyDelete
  2. windows XP sathi kase karayache he kalu shakel kaay?

    ReplyDelete
  3. लँग्वेजबार पुढीलप्रमाणे सक्रिय करता येईल. Control Panel > Clock, Language and Region > Change keyboards or other input methods > Click on change keyboards > Click on language Bar Tab > Click on Docked in the taskbar radio button

    ReplyDelete