मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) साठी ऑफर्स पे ऑफर्स | आगळं! वेगळं !!!

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) साठी ऑफर्स पे ऑफर्स

अखेर रोहटक, हरियाणा येथून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी योजनेला सुरुवात झाली. आणि त्याच बरोबर मोबाईल कंपन्याही ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठीच्या युद्धाची सुरुवात फ्री कनेक्शन, फ्री जीपीआरएस देऊ करून बीएसएनएलने केली. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना ऑफर देणारी बीएसएनएल ही पहिली कंपनी ठरली आहे.

जे ग्राहक बीएसएनएलकडे येतील त्यांच्याकडून पोर्ट इन चार्जेस घेतले जाणार नाहीत, बीएसएनएलच्या रोहटक येथील कस्टमर सर्विस सेंटर मधून जे ग्राहक या योजनेत येतील त्यांना फर्स्ट रिचार्ज कुपनसुद्धा फ्री दिले जाणार आहे. अ‍ॅक्टीव्हेशनच्या वेळी या ग्राहकांना शंभर रुपयांचा अतिरिक्त टॉकटाईमही दिला जाणार आहे. इतकेच नाही तर यासोबतच एक महिनाभर अनलिमीटेड जीपीआरएससुद्धा बीएसएनएलने ऑफर केले आहे.

या ऑफर्स पे ऑफर्स खाजगी क्षेत्रातील कंपन्या कशा मागे रहातील? आता या युद्धात टाटा डोकोमो ही कंपनी देखील उतरली आहे. त्यांनी आपल्याकडे स्विच होणाऱ्या ग्राहकासाठी लोकल ऑन नेट कॉल्सचा दर १ पैसा /६ सेकंदासाठी आणि दरमहा १०० एमबी डाटा ६ महिने देऊ केला आहे. त्याचसोबत फुल टॉकटाईमपेक्षा अधिक म्हणजे २०० च्या रिचार्जवर २२०, ३०० च्या रिचार्जवर ३५०, व  ४०० च्या रिचार्जवर ५०० कोअर टॉकटाईम बेनिफिट जाहीर केला आहे. याचबरोबर थ्रीजी सेवेबाबतही काही ऑफर देऊ केली आहे. या सर्व ऑफर्स ३१ डिसेम्बर २०१०पर्यंत टाटा डोकोमो कडे स्विच होणाऱ्या ग्राहकांना देऊ करण्यात आल्या आहेत.

एकूणच मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी बाबत मोबाईल कंपन्यांचे ऑफर्स पे ऑफर्स युद्ध सुरु झाले आहे.व यात आणखीन इतर कंपन्या उतरल्यानंतर तर ते अधिकच घमासान होईल असे म्हणायला काही हरकत नाही.

0 Comments:

Post a Comment