सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग-२ | आगळं! वेगळं !!!

सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग-२

या आधीच्या सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग-१ या लेखात आपण सुरक्षित व अभेद्य पासवर्ड तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पहिले. आता आपला पासवर्ड सहजपणे लक्षात रहाणारा कसा करता येईल, त्यासाठी कोणती युक्ती वापरायची ते पाहू.

समजा आता ahgo=>&do!tU's1f हा तुमचा सिक्युअर्ड पासवर्ड आहे, तर पहा बरे तुम्हाला तो लक्षात ठेवणे शक्य आहे का? नाही ना? तो तसा कितीही घोकला तरी लक्षात ठेवणे कठीणच आहे. पण तो तयार कसा केला आहे हे पाहिल्यास, मात्र लक्षात ठेवणे तुम्हाल सहज शक्य आहे ते पुढील उदाहरणावरुन स्पष्ट होईल.

यासाठी सर्वप्रथम सहज लक्षात रहाणारे एक वाक्य आपण येथे घेतले आहे, ज्याचा पासवर्ड तुम्ही वर पहिला आहे आणि जो लक्षात ठेवणे तुम्हाला कठीण वाटले आहे.

आता खालील वाक्याचे उदाहरण पहा.
Go ahead and do it yourself.
या वाक्यातील काही अक्षरे निवडून खालीलप्रमाणे शॉर्टफॉर्म केला आहे.
go ahead & do it slf
त्याचा पुन्हा खालीलप्रमाणे शॉर्टफॉर्म केला आहे.
go=>&do!tU's1f
यात ahead करिता => स्पेशल कॅरॅक्टर वापरले आहे. and साठी & हे स्पेशल कॅरॅक्टर वापरले आहे. i उलटे केल्यास ! सारखेच दिसते म्हणून i करिता ! हे स्पेशल कॅरॅक्टर वापरले आहे. एल l हे साधरणतः 1 सारखे दिसते त्यामुळे l ऐवजी 1 चा वापर केला आहे. yorself चा शॉर्टफॉर्म U's1f असा केला आहे.आता हा पासवर्ड yahoo साठी असल्याने सुरुवतीला ah वापरले आहे. ते कुठेही म्हणजे सुरुवतीला, मध्ये किंवा शेवटी वापरता येईल. याचप्रमाणे तुम्ही google साठी OO तर Microsoft साठी cr असे शॉर्टफॉर्मही वापरू शकता. फायनली हा पासवर्ड असा दिसेल.

ahgo=>&do!tU's1f

आणि बघता बघता हा झाला तयार तुमचा सुरक्षित व अभेद्य परंतु सहज लक्षात रहाणारा पासवर्ड, कारण तुम्ही Go ahead and do it yourself हे वाक्य लक्षात ठेवले की पटकन तुम्हाला तुमचा पासवर्ड नक्कीच आठवेल.

या प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीची एखाद्या कवितेची किंवा फिल्मी गाण्याची एखादी ओळसुध्दा यासाठी घेऊ शकता व तुमची कल्पना शक्ती वापरून त्याच्या शॉर्टफॉर्म मध्ये वेगवेगळे अंक व स्पेशल कॅरॅक्टर्स वापरू शकता.

म्हणजेच आता सुरक्षित आणि अभेद्य पण सहज लक्षात रहाणारा पासवर्ड तयार करणे सोपे तर आहेच पण मनोरंजकही तितकेच आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच.

0 Comments:

Post a Comment