लोणकढी थाप | आगळं! वेगळं !!!

लोणकढी थाप

"एने, साला जे थापाड्या लै च्यान्गली थाप मारेल तेला मी आज रोक शंबर रुपये बक्षीस देईल." घेलाशेठच्या या घोषणेवर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि का नाही होणार हो? घेलासेठ आधीच कंजूष मक्खीचूस माणूस, स्वतःच्या कापल्या करंगुळीवर मुततानाही तीनदा विचार करणारा, त्यात त्याने भर सभागृहात शंभर रुपये देण्याचं कबूल केल्याने लोकही आश्चर्यचकित झाले.
घेलासेठ एका संस्थेने आयोजित केलेल्या 'लोणकढी थाप' स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली, एकेक स्पर्धक स्टेजवर येऊन आपापल्या एकापेक्षा एक सरस 'थापा' सादर करू लागले. शेवटी टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धेचा शेवट झाला. सुत्रसंचालकाने परीक्षकांचा निर्णय जाहीर केला तो असा,सर्वोत्कृष्ट "लोणकढी थापबहाद्दर" म्हणून सर्व परीक्षकांनी एकमताने घेलाशेठ यांची निवड केली आहे."

0 Comments:

Post a Comment