ब्लॉगवर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) कशा दर्शवाव्यात? | आगळं! वेगळं !!!

ब्लॉगवर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) कशा दर्शवाव्यात?

तुम्हाला जर तुमच्या ब्लॉगवर जर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) दाखवायच्या असतील तर, एका फार सोप्या पद्धतीने तुम्ही त्या दाखवू शकता.

१. प्रथम डॅशबोर्ड मधून Design -> Page Elements हा पर्याय निवडा.

२. Add Gadget वर क्लिक करा.
३. Feed हा पर्याय निवडा.
४. आता उघडलेल्या Configure Feed window मध्ये http://yourblogname.blogspot.com/feeds/comments/default/ ही URL Enter करा. yourblogname येथे तुमच्या ब्लॉगचे नाव टाईप करा.५. आता येथून Auther/Date असे पर्याय तुम्ही निवडू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायांचा प्रिव्ह्यू खाली असलेल्या चौकटीत दिसू लागेल.६. Save वर क्लिक करा.
आता ब्लॉग पहा, त्यावर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments)दिसायला लागलेल्या असतील.

2 Comments:

 1. खर म्हणल तर मला हे application माझ्या ब्लोग साठी हवे होते. पण कॊणाला विचारयचे व कोण सांगणार हे वाटत असताना तुमची पोस्ट वाचली व त्या प्रमाणे करुन पाहीले . खुप आनंद झाला.

  आमच्या वेळेस{ तरूणपणी} आम्हास संगणक शास्ताचा अभ्यास क्रम नव्हता त्यामुळे तुमच्या सारख्या लोकांची मदत लागते.

  अन दुसरे म्हणजे आपल्या ह्या विषयावरच्या पोस्ट समजेल अशा भाषेत असतात.
  पुन्हा एकदा धन्यवाद.

  ReplyDelete
 2. सुधीरजी, आपले आभार. माझ्या लेखाचा आपणास उपयोग झाला हे वाचून आनंद वाटला.

  ReplyDelete