मोबाईल कॉल दर वाढणार? | आगळं! वेगळं !!!

मोबाईल कॉल दर वाढणार?

=> एफआयआरमध्ये अशोक चव्हाणांचे नाव; पण आरोपी नाही : आदर्श घोटाळा
  • या तत्वावर तर आमचीही नावे चालली असती की! : सर्व माजी मुख्यमंत्री
=> आयुष्यातील दहा वर्षे द्या; उज्वल भारत घडवू : राहुल गांधींची तरुणाईला साद
  • घराणेशाहीच्या राजकारणात पुढची दहा वर्षे 'सतरंज्या' उचलणारांची भरती सुरु
=> मोबाईल कॉल दर वाढणार? स्पेक्ट्रम वाटप धोरणात मोठा बदल : दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल
  • नवा मंत्री नवी घोषणा! दहा पैशात मोबाईल कॉल देण्याची 'सवंग' घोषणा करणाऱ्या 'राजाचं' राज्य गेलं!
=> विकास आणि पर्यावरणाचा मध्य गाठावा लागेल : पर्यावरण मंत्री जयराम रमेश
  • आणि असा गाठलेला मध्य निश्चितच 'आदर्श' ठरेल!
=> शाहरुखला नाटक करायचंय : सकाळ सप्तरंग पुरवणी
  • जास्त 'नाटकं' करु नकोस म्हणावं!

0 Comments:

Post a Comment