'टू-जी' पाठोपाठ आता 'कोल ब्लॉक' महाघोटाळा | आगळं! वेगळं !!!

'टू-जी' पाठोपाठ आता 'कोल ब्लॉक' महाघोटाळा

=> केंद्रीय मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल काही मंत्र्यांना वगळणार
  • चला निदान आज तरी डोक्यावरचं 'अवजड' ओझं कमी होईल असं काहींना वाटतयं
=> पक्षात वेगळे दुकान चालणार नाही; नितेश राणे यांच्या 'स्वाभिमान' ला कारभार आवरावा लागणार
  • येथे 'स्वाभिमान' आड येईल की, आडवा होईल? हे लवकरच कळेल.
=> 'टू-जी' पाठोपाठ आता 'कोल ब्लॉक' महाघोटाळा; कोट्यवधीचे कोळसा पट्टे मोफत वाटले
  • या ओरडण्याला काही अर्थ आहे का? अहो, कोळश्यात हात घातल्यावर ते काळे होणारच की!
=> 'लवासा' प्रकल्प अनधिकृत, बांधकामाला दिलेली स्थगिती कायम; अटी व शर्थी पाळणे बंधनकारक
  • 'लवासा'त मुक्तपणे बागडताना अशी 'बंधने' तुटतात कधी कधी.
=> 'आदर्श' प्रकरणी तीन महिने झाले गुन्हा का दाखल केला नाही? : हायकोर्टाचा सवाल
  • अजून 'अहवाल' यायचायं, त्यानंतर 'अभ्यास' होईल मग गुन्हा दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव 'विचाराधीन' होईल.

0 Comments:

Post a Comment