हरवले सापडलेसाठी वेबसाईट | आगळं! वेगळं !!!

हरवले सापडलेसाठी वेबसाईट

जेव्हा आपले किंवा कुणा इतरांचे वाहन अथवा व्यक्ती हरविल्याचा प्रसंग येतो, तेव्हा काय करावे हे लवकर न सुचणे स्वाभाविकच आहे. अशावेळी एकदम गांगरून न जाता धीर धरावा. आणि हरविलेल्या वाहनांचा किंवा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी किंवा अशा हरविलेल्या अथवा सापडलेल्या व्यक्ती व वाहनांची माहिती नोंद करण्यासाठी भारत लॉस्ट अँड फाउंड डॉट कॉम ही एक वेबसाईट आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहे याची आठवण ठेवावी.


या वेबसाईटवर 1.Lost/Found Vehicles 2. Untaken Bodies 3.Lost/Found Children असे प्रमुख तीन विभाग दिसतात. आणि त्या त्या विभागात सापडलेले/हरविलेले शोधण्यासाठी व नोंद करण्यासाठीचे पर्याय दिसतात. या सर्व पर्यायांचा आपल्याला गरजेनुसार वापर करता येईल.

समजा आपले मुल हरविले आहे, तर काय करावे या विषयीच्या छोट्या परंतु उपयुक्त सूचना आपणास या वेबसाईटवरील What To Do वर क्लिक केल्यास पहायला मिळतील. हरविलेल्या व्यक्तीसंबंधी टीव्हीवर माहिती देण्यासाठीसुद्धा यांच्याशी संपर्क साधता येईल.

0 Comments:

Post a Comment