फायरफॉक्स ब्राऊजरसाठी मराठी अ‍ॅड ऑन | आगळं! वेगळं !!!

फायरफॉक्स ब्राऊजरसाठी मराठी अ‍ॅड ऑन

आपण जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, मराठीतून शुद्धलेखन तपासण्यासाठी (Spell Checking) मराठी डिक्शनरी ९.१ ही एक उत्तम अ‍ॅड ऑन सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे.
फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असलेल्या व संगणकावर मराठी भाषेतून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक अत्यंत उपयुक्त असे अ‍ॅड ऑन आहे. यामुळे हा ब्राऊजर वापरून आपण जेव्हा मराठीतून लिखाण करतो, तेव्हा या डिक्शनरीला वाटणाऱ्या चुकाखाली लाल रंगाची नागमोडी रेषा दिसून येते, आणि त्या शब्दावर राईट क्लिक केले असता त्या शब्दाला पर्याय सुचविलेले दिसतात.
१. हे अ‍ॅड ऑन डाऊनलोड केल्यानंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करावे.

२. ही सुविधा कार्यान्वित करण्यासाठी मजकुरावर राईट क्लिक करून Check Spelling हा पर्याय निवडून त्याखालील Languages या पर्यायापुढील Marathi/India  हा पर्याय निवडावा.  वर्डस्मिथ विजय पाध्ये, मेघना भुस्कुटे, वालावलकर अशा अनेक सदस्यांच्या सांघिक प्रयत्नातून तयार झालेला शब्द संग्रह. आणि मग त्याला शंतनू ओक यांनी तांत्रिक जोड दिल्यावर बनलेले चांगले अ‍ॅड ऑन आहे, अशी माहिती या अ‍ॅड ऑनच्या डाउनलोड वेबपेजवरील प्रतिक्रियेतून मिळते.

खाली दिलेल्या लिंकवरून ही सुविधा डाऊनलोड करता येईल.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/

2 Comments:

  1. भोवरा, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

    ReplyDelete