ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर आपोआप कशा प्रसिद्ध कराव्यात? | आगळं! वेगळं !!!

ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर आपोआप कशा प्रसिद्ध कराव्यात?


मी ब्लॉग सुरु केल्यापासून माझ्या ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर काही प्रसिद्ध होत नव्हत्या. आणि त्या आपोआप कशा प्रसिद्ध करायच्या याचीही मला कल्पना नव्हती. मग पुढे काही दिवसांनी गुगल फीड मध्ये Socialize एक नावाचा पर्याय यासाठी उपलब्ध आहे असं माझ्या लक्षात आलं.
पण Socialize या पर्यायातून फक्त ट्विटरवरच पोस्ट प्रसिद्ध केल्या जाऊ शकत होत्या,  आणि फेसबुकसाठी तेथे जागा नव्हती.


त्यामुळे आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक पोस्टच्या लिंक फेसबुकवर मला स्वतःला जोडाव्या लागत होत्या.

ट्विटरवर आणि फेसबुकवर एकाचवेळी आपल्या ब्लॉगवरील पोस्ट्स आपोआप कशा प्रसिद्ध कराव्यात याविषयी मराठीतून माहिती मला उपलब्ध होत नव्हती. मग त्यादृष्टीने शोध सुरु झाला. आणि शोध घेता घेता मला अशी एक वेबसाईट सापडली की, ज्यावरून ट्विटरवर आणि फेसबुकवर अशा दोन्हीकडे माझ्या ब्लॉगवरील पोस्ट्स आपोआप प्रसिद्ध केल्या जाऊ शकतील.

कदाचित आपणापैकी काहीजणांना ही वेबसाईट आणि त्यावरील ही सुविधा आधीच माहित  असेलही पण त्याविषयी मराठीत कुठेही लेख मला न आढळल्याने ज्यांना माझ्याप्रमाणेच याविषयीची माहिती नसेल त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहिला आहे.

१. http://twitterfeed.com/ या वेबसाईटवर जा.

२. साईन अप् व्हा. किंवा तुमच्या गुगलसारख्या ओपन आयडीने साईन इन होण्याचा पर्यायही येथे उपलब्ध आहे.
३. Create New Feed येथून New Feed-->Step 1 Create Feed-->Feed Name व Blog URL or RSS Feed URL Address टाईप करा.४. Continue to step 2 वर क्लिक करा.

५. येथील Available Services मधील ट्विटर सिलेक्ट करा.६. ट्विटर कडून परवानगीची विचारणा झाल्यावर परवानगी द्या.

७. डन वर क्लिक करा.

याच स्टेप्स पुन्हा एकदा फेसबुक साठी फॉलो करा.

यांनतर तुमच्या ब्लॉगवर जेव्हा तुम्ही नवीन पोस्ट प्रसिद्ध कराल, तेव्हा तुमच्या ट्विटर आणि फेसबुक वरील अकाऊंटवर त्या आपोआप प्रसिद्ध होऊ लागतील.

येथे तुम्ही एकाहून अधिक ब्लॉग्ज फीड्स सुद्धा अ‍ॅड करू शकता. आणि येथे फीड दर अर्ध्या तासाने अपडेट होत रहाते. तसेच अ‍ॅड झालेल्या लिंक्सवर किती क्लिक्स झाले आहेत याचीही आकडेवारी येथे दिसते.

3 Comments:

 1. सुंदर माहिती...
  धन्यवाद

  ReplyDelete
 2. भोवरा, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  ReplyDelete
 3. अप्रतिम व मौलिक माहिती

  ReplyDelete