'अभ्यास' हा शासनाचा आवडता उपक्रम | आगळं! वेगळं !!!

'अभ्यास' हा शासनाचा आवडता उपक्रम

=> स्वीस बँकेतील खात्यांची माहिती 'विकीलीक्स' कडे; २००० नावांची यादी जाहीर होणार
  • आता हा 'विकी' कुणाकुणाला 'क्लिक' करून 'लिक' करणार बरे? आम्ही तर अस्वस्थ झालोय.
=> 'आदर्श' ची इमारत पाडण्यावर सरकारचे 'थांबा आणि पहा' पर्यावरण मंत्रालयाच्या शिफारसीबाबत 'अभ्यास' सुरु
  • कोणत्याही गोष्टींचा 'अभ्यास' हा शासनाचा अत्यंत आवडता उपक्रम

=> केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल? तरुण चेहऱ्यांना संधी?; पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटले
  • फेरबदल करायचाच आहे तर तेवढे 'घोटाळे निर्मुलन' आणि 'महागाई नियंत्रण' खाती निर्माण केलीत तर बरे होईल.
=> फोडणीचाही भडका; खाद्यतेल महागले, टोमॅटोही भडकले
  • सर्वसामान्यांच्या जगण्यावर महागाईचा 'तडका'

1 Comments: