कुठे आहेत मराठी वाहिन्या? | आगळं! वेगळं !!!

कुठे आहेत मराठी वाहिन्या?


आजकाल जिकडे पहावे तिकडे घराच्या छतावर छत्र्यांचे पिक उगवलेले दिसते. आता केबल ऑपरेटरकडून कनेक्शन घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीची डिशअँन्टेना घराच्या छतावर लावून वाहिन्या पहाणे लोकप्रिय होत आहे. यात विविध सशुल्क खाजगी कंपन्यासोबतच देशातील पहिली संपूर्णतः मोफत वाहिन्या दाखविणारी DD DirectPlus ही दूरदर्शनची डिशअँन्टेना आजही आपली लोकप्रियता कायम टिकवून आहे.

DD DirectPlus  डिशअँन्टेना वर दाखविल्या जाणाऱ्या वाहिन्यांच्या यादीकडे नजर टाकली असता,


DD National       DD North-East     9X            DW TV         ABN Andhra Jyothi
DD News           DD Oriya            9XM         Jaihind TV    Mh 1 Music
DD Sports          DD Podhigai        Chardikla                   Time TV         NHK    
DD India            DD Punjab           VYAS                       News Live      Kalaignar TV
DD Bharati         DD Sahyadri        PTC News                Amrita TV      Mh 1
DD Bangla         DD Saptagiri        Aastha TV                 Russia Today  Star Utsav
DD Chandana    DD Malayalam     ETC                          News 24         Zee Smile
DD Gujarati       DD Urdu              Shakthi TV                Kairali T.V      P7 News
Lok Sabha TV   Rajya Sabha TV   Shraddha Channel     Enterr 10         Total TV
DD Kashir         Care World TV    Azad News               B4U Music      IBN Lokmat
DD HD             Mega Tv               Mahua TV                 Zee Jagran       SVBC
Gyandarshan 1  Gyandarshan 2                 

या यादीत दूरदर्शनच्या राष्ट्रीय व प्रादेशिक अशा एकूण २२ वाहिन्या आहेत. तर इतर ३५ खाजगी वाहिन्या आहेत. या खाजगी वाहिन्यात सुमारे १८ हिंदी, व बाकी इतर सर्व तामिळी, मल्याळम, कानडी, पंजाबी, भोजपुरी, कोरियन, इंग्रजी, जपानी, जर्मनी, रशियन या भाषेतील वाहिन्या आहेत. या संपूर्ण खाजगी वाहिन्यात एकही मराठी भाषेतील वाहिनी नाही. एक IBN Lokmat ही मराठी भाषेतील वाहिनी होती ती, मागील काही दिवसापासून सशुल्क झाल्यामुळे आता ती ही दिसणे बंद झाले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील व संपूर्ण देशभरात असलेल्या मराठी भाषिक प्रेक्षकांना DD DirectPlus वर DD Sahyadri या दूरदर्शनच्या सरकारी मालकीच्या वाहिनीचा अपवाद वगळता एकही खाजगी मराठी वाहिनी पहाण्यास उपलब्ध नाही, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. 
सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमही चांगलेच असतात यात वाद नाही. परंतु ही सरकारी असल्याने त्यांच्या सादरीकरणाचा बाज वेगळाच असतो. इतर खाजगी वाहिन्याप्रमाणे त्यात व्यावसायिकपणा नाही. त्यामुळे साहजीकच त्यांच्या आणि खाजगी वाहिन्यांच्या सादरीकरणातील फरक प्रेक्षकांना जाणवतो. त्यामुळे सध्यातरी मराठी भाषिक प्रेक्षकांना DD DirectPlus वर DD Sahyadri शिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

अगदी डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातही मोठया आवडीने पहिल्या जाणाऱ्या अत्यंत लोकप्रिय अश्या DD DirectPlus या मोफत डिशअँन्टेनाच्या माध्यमाकडे सर्वच मराठी वाहिन्यांनी पाठ फिरवावी ही मराठी भाषेची की मराठी प्रेक्षकांची उपेक्षा समजायची?

2 Comments:

 1. नमस्कार रमनजी,

  मी आपल्याशी १००% सहमत आहे. मराठी वाहिन्या व त्याच प्रमाणे मराठी भाषा दुर्लक्षीत होते आहे.
  मराठी वाहिन्या दाखविण्याची सक्ती ही राज्यात झालीच पाहिजे.

  मी याच विषयाशी संबधीत माझे विचार २१-११-२००९ रोजी मांडले होते.
  http://blogmajha.blogspot.com/2009/11/blog-post_21.html

  ReplyDelete
 2. रमणजी,
  आपले म्हणणे १००% खरे आहे.मुळात मराठी माणुस आणि त्या मुळे मराठी शासनकर्ते हेच त्या बाबतीत प्रचंड उदासीन आहेत त्या मुळे दोष कुणाला द्यायचा?
  स्वत: महाराष्ट्रीयन असुन ही माझे स्पष्ट मत आहे कि मराठी माणसाला फ़क्त नाकाच्या शेंड्या वर राग तेवढा येतो आणि त्याची दादागिरी त्या तुलनेत कमजोर असणाऱ्या वर्गा पुढेच चालते.आता तर प्रमुख प्रादेशिक पक्ष सुद्धा उघड उघड जाती भेदाचे राजकारण करावयास लागले आहेत,त्या मुळे ह्या महत्वाच्या पण मराठी प्रश्ना कडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे नि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यात त्यांचा काय फ़ायदा आहे?त्या मुळे आहे ते ठीक आहे असे म्हणायचे अन काय?

  ReplyDelete