काँगेसचा दिग्गीराजा तो 'बाब्या' | आगळं! वेगळं !!!

काँगेसचा दिग्गीराजा तो 'बाब्या'

काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्‌! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच.तसं पाहायला गेलं तर, कोंग्रेस पक्षाने युवराजांना सांभाळण्यासाठी ठेवलेला हा 'बाब्या' आहे. (सांभाळ करणारी ती 'बाई' आणि सांभाळ करणारा तो 'बाब्या'.) त्यामुळे अर्थातच युवराजांचे मन रिझवण्यासाठी आणि श्रेष्ठींची मर्जी सांभाळण्यासाठी इतरांना वाकुल्या दाखवणे, विदुषकी चाळे करणे, चमचेगिरी करणे अशी खुशमस्करीची कामे त्यांना पार पाडावी लागत आहेत.

आता हा बाब्याचा उल्लेख केलेला गंमतीदार भाग बाजूला ठेवला तर, सातत्याने अतिशय वेगळ्याप्रकारची वादग्रस्त विधाने करून येनकेनप्रकारे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिग्गीराजाबाबत कोंग्रेसने आजपर्यंत मौन का पाळले आहे? या मौनावरून अशी विधाने करण्यासाठी पक्षाची त्यांना फूस आहे, हेच सिध्द होते. आणि दिग्गीराजांना सांभाळून घेण्यासाठी इतर प्रवक्त्यांना बरीच कसरत करावी लागते, त्याचे कारण शेवटी आपला तो पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतला 'बाब्या'!

दिग्गीराजांनी जाहीरपणे असे आरोप करणे म्हणजे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न असेच म्हणावे लागेल. तसे नसते तर त्यांनी तपासयंत्रणांना पुराव्यासह माहिती देवून एक जबाबदार नागरिक या नात्याने आपले कर्तव्य कोणताही गाजावाजा न करता पार पाडले असते, आणि पक्षश्रेष्ठींनीही त्यांना तसेच करण्याचा सल्ला दिला असता. पण असे घडताना दिसत नाही, कारण पक्षश्रेष्ठींना आणि दिग्गीराजांना दोघांनाही जबाबदारीपेक्षाही विदुषकी चाळ्यांची सवय लागली आहे.

तपासयंत्रणांच्या दिग्गीराजाविषयीच्या भूमिकेबद्दलही शंका उपस्थित होते. कारण दुसऱ्या इतर कोणी असे बॉम्बस्फोटासंदर्भात विधान, आरोप केले असते तर, तपासयंत्रणांनी त्याला केव्हाच 'उचलले' असते. पण दिग्गीराजा अजूनही 'मोकाट' कसे? बॉम्बस्फोटासंदर्भात असलेली माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपाखाली त्यांना याआधीच अटक व्हायला हवी होती.

पण असे घडले नाही आणि घडेल असेही वाटत नाही. कारण दिग्गीराजा आपलेच आणि तपासयंत्रणाही आपलीच! मग त्यांना हात लावण्याची हिंमत कोणाकडे आहे? सगळाच बेशरमपणाचा कळस आहे.

0 Comments:

Post a Comment