भगवं-निळं | आगळं! वेगळं !!!

भगवं-निळं

=> तंबाखूच्या पुड्यांवर १ डिसेंबरपासून अधिक कडक इशारा
 • म्हणजेच आता आपल्या तंबाखूचा स्वाद होणार आणखी कडक आणि लज्जतदार!
=> डॉ. श्रीराम लागू 'वन रूम किचन'मध्ये; सहा वर्षांनी चित्रपटात पुनरागमन
 • 'वन रूम किचन' म्हणजे फारच 'कन्जस्टेड' वाटतयं, नाही का?
=> मामाचा गाव हरवला; उन्हाळी सुटयांबाबत लोकमत समूहाचे सर्वेक्षण
 • मामाचा गाव अजूनही नाही हरवला; तर भाच्यांचा उन्हाळी सुटीतील 'हक्काचा आनंद' त्यांच्याच पालकांनी 'हिरावला'
=> दोनाचे चार करा; मुख्यमंत्र्यांवर दबाव, पॅनेल पद्धतीवरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये राजकीय वादळ!
 • 'बाबा' 'म्हा'पालिका 'घाईला' आलीयं, यंदा 'दोनाचे चार होऊन जाऊ द्यातच' (न्हाय तर दुसऱ्यासंगं भगवं-निळं करलं येखांद्यावेळी!)

3 Comments:

 1. तंबाखूच्या पुड्यांवर १ डिसेंबरपासून अधिक कडक इशारा
  म्हणजे खप अजून नक्की वाढणार,वाढला पाहिजे ही सरकारेच्छा दिसतीये
  मामाचा गाव हरवला; उन्हाळी सुटयांबाबत लोकमत समूहाचे सर्वेक्षण
  मामाचा गाव नाही अहो मामाच हरवलाय !त्याला तरी कुठे वेळ आहे?

  ReplyDelete
 2. मामाचा गाव अजूनही नाही हरवला; तर भाच्यांचा उन्हाळी सुटीतील 'हक्काचा आनंद' त्यांच्याच पालकांनी 'हिरावला' हेच खरे आहे.
  ही शहरी पालक मंडळी मुलांना कुठल्या ना कुठल्यातरी शिबिरात त्यांच्या भाषेत 'अ‍ॅक्टीव्हीटीज'मध्ये गुंतवून ठेवतात, मग मुलांनी सुटीत मामाकडे जायचे कसे आणि कधी? याचा दोष मामांना देण्यात काय अर्थ आहे? तो बिचारा भाच्यांना वेळ नाही कधी म्हणाला?
  ग्रामीण भागात आजही भाचे कंपनी मामाच्या गावाला जातात आणि मामानेही (अर्थातच मामा, मामी, आजोबा आणि आजी या सर्वांनीच) अजूनही वेळ नाही ही सबब सांगितलेली दिसत नाही.

  ReplyDelete
 3. रमणजी,विधान विनाशर्त मागे.... ग्रामीण मामा साठी.
  पण शहरी मामाचा मात्र पुरता मामा झालाय:)

  ReplyDelete