आता मोबाईल रिचार्ज करा पाण्यावर! | आगळं! वेगळं !!!

आता मोबाईल रिचार्ज करा पाण्यावर!


आपल्या जीवनात पुष्कळश्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, कॅमेरा यासारखी उपकरणे आपण वापरतो की जे बॅटरीवर चालतात. आणि त्याची बॅटरी डाऊन होण्याचे प्रसंगही नेहमीच येतात. या बॅटऱ्या रिचार्ज करण्यासाठी इलेक्ट्रीक, सोलर असे विविध प्रकारचे चार्जर्स उपलब्ध आहेत. पण वीज नाही अन् सूर्यप्रकाशही नाही मग चार्जिंग कसे होणार? याची आता चिंता करण्याचे कारण नाही. पाणी तरी आहे ना?


स्विडीश फ्यूएल सेल कंपनी myFC ने चक्क पाण्यावर चालणाऱ्या ‘PowerTrekk’या अद्भूत चार्जरची घोषणा केली आहे. हा चार्जर clean fuel cell technologyचा उपयोग करुन हायड्रोजेनचे इलेक्ट्रीसीटीमध्ये रुपांतर करतो असा कंपनीचा दावा आहे. तुम्ही फक्त यात साधे पाणी टाकण्याची गरज आहे, की हा चार्जर तुमचे मोबाईल, कॅमेरा यासारख्या उपकरणांच्या बॅटरीज रिचार्ज करायला तयार!

वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणी ज्यांना आपला वेळ घालवावा लागतो अशांना तर हे बॅटरी पॅक आणि फ्युएल सेल असलेले‘PowerTrekk’पोर्टेबल उपकरण फारच उपयोगी ठरेल.

0 Comments:

Post a Comment