आकाश टॅब्लेट पीसी रु.2500 मध्ये उपलब्ध | आगळं! वेगळं !!!

आकाश टॅब्लेट पीसी रु.2500 मध्ये उपलब्ध

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असा सर्वांनाच उत्सुकता असलेला आकाश टॅब्लेट पीसी आता केवळ रु.2500/- मध्ये उपलब्ध झाला आहे.


आकाश टॅब्लेट पीसीची Android 2.2 प्रणाली, Arm11–366Mhz मायक्रोप्रोसेसर, 2100 mAh बॅटरी, WiFi नेटवर्क अशी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.

WiFi & GPRS (SIM & Phone functionality)सुविधा असलेली आकाशची अपग्रेडेड व्हर्जन UbiSlate 7 ची सुध्दा पूर्वनोंदणी सुरु आहे. त्याची किंमत रु.2999 इतकी आहे. मात्र UbiSlate 7 मिळण्यासाठी जानेवारी 2012 पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

आकाश टॅब्लेट पीसी ऑनलाईन विक्रीसाठी आकाशची ऑफीशीयल वेबसाईट http://www.aakashtablet.com/येथे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि ऑर्डर दिल्यापासून एक आठवड्यात तो मिळेल व यासाठी कॅश ऑन डिलेव्हरीचा पर्याय उपलब्ध आहे.

0 Comments:

Post a Comment