Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवर कलाकाराची फसवणूक | आगळं! वेगळं !!!

Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवर कलाकाराची फसवणूक

कलाकारांना कसे फसवले जाते?

Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवरील अनुभव


कलाकारांना कसे फसवले जाते? याचे एक उदारहण म्हणून Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवर रांगोळी कलाकार प्रसाद मुंढे यांना आलेला अनुभव वाचा त्यांच्याच शब्दात.


सोनी चॅनल ची मालिका बडे अच्छे लगते है च्या सेटवर ५ तास वाट बघितल्यावर मला सेटवर ही रांगोळी काढायला सांगितली. मी या एका रांगोळीसाठी तीन हजार चार्जेस सांगितले होते.


https://www.aagalavegala.in/
cheating artist on the set of sonyliv's series bade achhe lagte hain


शॉटसाठी लागणारी रांगोळी काढून झाल्यानंतर खलनायकाने शॉट ओके होण्यासाठी रांगोळी वर उभे राहून केलेली डायलॉग बाजी झाल्यावर पूर्ण रांगोळी डिस्टर्ब झाली. 


नंतर स्वतःला आर्ट डायरेक्टर म्हणवणाऱ्या मुलीने मला पुन्हा तशीच रांगोळी काढायला सांगितली. ज्याची आधी मला कुठलीही पूर्व कल्पना दिली नव्हती. मला फक्त एवढेच सांगितले होते, 'आप एक रंगोली करके निकल जाओ, आपको तुरंत पेमेंट मिलेगा।' 

https://www.aagalavegala.in/
cheating artist on the set of sonyliv's series bade achhe lagte hain

नंतर ती रांगोळी पूर्ववत करणे शक्य नसल्याने त्यांना मी सांगितले पूर्ण रांगोळी नविन करावी लागेल व त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस होतील. त्याला त्या आर्ट डायरेक्टरने विरोध दर्शविला व सांगितले, 'जो किया है उसका भी पेमेंट नहीं मिलेगा।'


त्यांनंतर मला प्रोडक्शन हाऊसकडे नेले. त्यांना सर्व वृत्तान्त सांगितल्यावर त्या मॅनेजरने मला सांगितले 'तेरे को करने का है तो कर नहीं तो निकल, पैसा नहीं मिलेगा।'


असं बोलल्यावर मी बॅग घेऊन सेटवरुन निघालो. त्यांचा शॉट अडकल्यामुळे तेथील १५-२० आर्ट डिपार्टमेंटचे लोक माझ्या मागे येऊन समजाऊ लागले की, 'सर करो आप हम पेमेंट देते है आपको।'


दुपारी १२ वाजल्यापासून सुरु झालेले हे नाटक रात्री ८ वाजले तरी चालू होते. शेवटी पेमेंट अडकल्याने मी रांगोळी करायचा निर्णय घेतला.


रांगोळी पूर्ण झाली, मालिकेचा हिरो रांगोळी काढतोय हा शॉट पण ओके झाला. आता राहिले माझे पेमेंट. मला सांगितले, 'आपके अकाउंट में आयेगा कल।' 


मी ही १० वाजले होते. उशीर झाला म्हणून निघालो. तिथे येण्या-जाण्यासाठी पावसामुळे कॅबचे १६०० रुपये झाले. 


नंतर दुसऱ्या दिवशी अकाऊंटला ३ हजार फक्त आले. २ रांगोळ्यांचे ६ हजार झाले असताना मला फक्त ३ हजार दिले. त्यांना वारंवार फोन करुन ही आजपर्यंत फोन कोणी उचलला नाही.


नंतर ८ दिवसाने मला परत फोन आला, 'सर सेट पे रंगोली करना है।' त्यानंतर त्याला सौम्य भाषेत सांगितले, 'वो सिरीयल का नाम चेंज करो, बडे चुतिये लगते है यह रखो।' असं बोलल्यावर त्याने फोन कट केला.


सर्वात महत्त्वाचे काही रांगोळी कलाकार हुजरेगिरी करण्यासाठी पाचशे सहाशे रुपयांत सेटवर जाऊन रांगोळ्या काढतात व स्वतःची किंमत कमी करुन घेतात. या चॅनल मालिका यांना हेच हवे असते. वेळीच सावध व्हा. अशा फसवणूकी पासून लांब रहा.


कलाकारांना फसवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या या मालिका व या चॅनलवर पूर्ण बहिष्कार टाकला आहे.

1 Comments:

  1. सर्वच क्षेत्रात हे असे आहे. मी माझ्या मित्राला ६००० चे मटेरियल दिले ३ वर्षांपूर्वी तो अजून त्याचे पेमेंट करीत नाही. तुम्हाला ३००० तरी मिळाले. अभिनंदन. आणि हो नाव अतिउत्तम सुचवले.

    ReplyDelete