कशाला डोकं खाता भाऊ | आगळं! वेगळं !!!

कशाला डोकं खाता भाऊ
दारु गुटखा आणि मटका
कठीण आहे यातून 
व्यसनाधिनांची सुटका

मावा बंद, पण तंबाखू चालू
गुटखा बंद, पण सिगारेट चालू
हातभट्टी बंद, पण विदेशी चालू
मटका बंद, पण लॉटरी चालू

कायद्याने बंदी म्हणजेच
नोकरशाहीची चांदी
म्हणजे काम बंद
पण रस्ता चालू 

कशाला डोकं खाता भाऊ
जाऊद्या दुसऱ्या विषयावर 
काही तरी बोलू

0 Comments:

Post a Comment